पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यापूर्वी आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती, अशी माहिती तपासात निदर्शनास आली आहे. या खून प्रकरणात तोरमकर, कदम यांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाडने साथीदारांची जमवाजमव केली होती. आंदेकरांचे त्यांची बहीण संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून काेमकर यांनी गायकवाड याच्याशी संपर्क साधला होता. गायकवाड, कोमकर, प्रसाद बेल्हेकर, अनिकेत दूधभाते यांनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचला होता.
हेही वाचा – संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना
हेही वाचा – पितृपंधरवड्यात भाज्या महाग
मोक्का कारवाई केल्यानंतर गायकवाड जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला. आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर गायकवाडसाठी काम करत होते. आंदेकर यांचा खून करण्यापूर्वी आरोपींनी नियोजन केले होते. १ सप्टेंबर रोजी आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम हे डोके तालीम परिसरातील उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत थांबले होते. रात्री नऊच्या सुमारास त्यांच्यावर दूधभाते आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच कोयत्याने वार केले. त्यांचा खून करण्यापूर्वी आरोपी तोरमकर आणि कदम यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी आंदेकरांवर पाळत ठेवली होती. आंदेकर कायम कार्यकर्त्यांबरोबर असल्याची माहिती आरोपींना होती. तोरमकर आणि कदम यांनी चौकातील एका पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. आंदेकर आणि त्यांचा भाऊ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर कार्यकर्ते नव्हते. तोरमकर आणि कदम यांनी संधी साधली आणि सेव्हन लव्हज चौकात थांबलेल्या साथीदारांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात आंदेकर यांच्यावर आरोपींनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.