मुलगी झाल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शिरगावात उघडकीस आली आहे. चांगुणा योगेश जाधव असं  २० वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आरोपी पतीचे योगेश कैलास जाधव असे नाव असून त्यांना एक मुलगी आहे. मुलगा का झाला नाही? यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चांगुणा आणि योगेश याचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. त्यांना मुलगी झाली. मात्र यावर योगेश नाराज होता. त्याला मुलगा हवा होता. यातूनच त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली. मुलगी झाली आणि  मुलगा झाला नाही म्हणून योगेश भांडायचा. तसेच चांगुणाला मारहाण करायचा. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास चांगुणा कपडे धुत होती. तर, लहान मुलगी गाढ झोपेत असताना चांगुणा यांचा गळा पती योगेशने आवळत खून केला. संबंधित घटनेची कुणकुण शेजाऱ्यांना लागली त्यांनी तातडीने शिरगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी योगेश ताब्यात घेत असून खून केल्याची माहिती दिली आहे. घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune shirgaon husband angry as daughter is born murder by strangling wife rmt 84 kjp