pune university admission applications number has decreased | Loksatta

कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी? विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना एक आकडी प्रवेश

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास साडेपाच हजार प्रवेश अर्ज कमी झाले.

कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी? विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना एक आकडी प्रवेश
पुणे विद्यापीठ

राज्यातील आणि देशातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बऱ्याच विभागांमध्ये प्रवेश घटले आहेत. काही अभ्यासक्रमांसाठी तीस, साठ अशी प्रवेश क्षमता असताना केवळ एक आकडीच प्रवेश झाल्याचे समोर आले आहे. करोनाच्या प्रादुर्भावानंतर यंदा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत अर्जसंख्या घटल्याचे निदर्शनास आले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास साडेपाच हजार अर्ज कमी झाले.

हेही वाचा- अजित पवार यांच्या उपस्थितीत थेरगावात सोसायट्यांचा मेळावा ; शहरातील सोसायट्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेत काही अभ्यासक्रमांना अक्षरशः एक आकडी प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाने कमी प्रवेश होणाऱ्या अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन प्रतिसाद नसलेले अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचे परिप्रक प्रसिद्ध केले होते. विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना शासनाकडून निधी मिळत नसल्याने त्यांना विद्यापीठ निधीतून निधी दिला जातो. विद्यापीठ निधीतून चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रतिसाद असल्यास प्राध्यापकांचे वेतन, पायाभूत सुविधांवरील खर्च कायम राहत असल्याने त्याचा आर्थिक फटका विद्यापीठालाच सहन करावा लागतो. त्यामुळे आता यंदाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर अत्यल्प प्रतिसाद मिळालेले अभ्यासक्रम बंद केले जाणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा- पुणे : बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड, भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची टीका

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे म्हणाले, की अभ्यासक्रमाला प्रवेश कमी झाले म्हणून बंद करणे हा पर्याय योग्य नाही. तर प्रवेश का कमी झाले किंवा होतात याची कारणे शोधणे आणि उपाययोजना करणे गरजेचे आहे. ते विद्यापीठाकडून केले जाईल. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींनुसार बऱ्याच अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यात हे अभ्यासक्रम श्रेयांकांद्वारे अन्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येऊ शकतील, प्रयोगशाळा आवश्यक नसलेले अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीनेही शिकता येऊ शकतील.

हेही वाचा- कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम निवडीचा कल बदलत असतो. त्यामुळे काही अभ्यासक्रमांना पुरेसे प्रवेश न होणे शक्य आहे. प्रवेश झाले नाही म्हणून अभ्यासक्रम बंद करणे सोपे आहे, पण अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता मिळवणे कठीण आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

क्रमवारीवर परिणाम

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये अभ्यासक्रमांचे वैविध्य आहे. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम राबवले जातात. मात्र या अभ्यासक्रमांना क्षमतेइतके प्रवेश होत नसल्यास त्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीवरही परिणाम होतो. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाचे क्रमवारीतील स्थान घसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढवण्याकडे विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्या

मॅन्यूस्क्रिप्टॉलॉजी (३), पदव्युत्तर पदवी संगीत (७), नृत्य (७), नाट्यशास्त्र (४), शहरी पाणी व्यवस्थापन एकात्मिक पदव्युत्तर पदविका (५) पदव्युत्तर पदवी भूतंत्रज्ञान (२), उर्दू भाषा पदविका (१), नवसंकल्पना पदव्युत्तर पदविका (१), अमराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी (२), संहिता लेखन (६), पाली प्रगत पदविका (७), बुद्धिस्ट स्टडीज पदव्युत्तर पदवी (९), पदव्युत्तर पदविका आंबेडकर आणि बुद्धिझम (८) प्राकृत पदव्युत्तर पदवी (३) इत्यादी
विज्ञान आणि तंत्रज्ञान सायंटिफिक कम्प्युटिंग पदव्युत्तर पदवी (२७), प्रॉडक्शन ग्राफिक डिझाइन (२०), व्यावसायिक थ्रीडी ॲनिमेशन आणि व्हीएफक्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम (१६), व्यावसायिक व्हिज्युअल इफेक्ट्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम (२), एम.टेक. पीएच.डी. स्थापत्य आणि पर्यावरण (६), एम.टेक. पीएच.डी. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान (१७)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : शंकरशेठ रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; पावणे चार लाखांचे मेफेड्रोन जप्त

संबंधित बातम्या

आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान
पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
राज्यपालांविरोधात पुण्याच्या माजी महापौरांचे राजभवनापुढे धरणे आंदोलन
टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Laptop खराब होण्याची चिंता विसरा; स्वच्छ करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट
IND vs BAN: आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास! बांगलादेशने जिरवली आणि रोहित सेनेच्या खिशाला कात्री
‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…