राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.५४ टक्के लागला. राज्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.९४ इतकी असून, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.१८ इतकी आहे. मंडळाच्या इतिहासात दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱयांचे प्रमाण सर्वाधिक असलेला हा निकाल आहे. 
शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळांवर दुपारी एका वाजेपासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.१४ टक्क्यांनी वाढले आहे. यंदाच्या वर्षी एकूण १५ लाख ७२ हजार २६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
कोकण – ९६.५४
कोल्हापूर – ९५.१२
पुणे – ९५.१०
मुंबई – ९२.९०
नाशिक – ९२.१६
औरंगाबाद – ९०.५७
नागपूर – ८७.०१
अमरावती – ८६.८४
लातूर – ८६.३८
एसएमएसवरही निकाल
संकेतस्थळांबरोबरच एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळू शकेल. राज्यातील बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर MHSSC < (स्पेस) परीक्षा क्रमांक > असा एसएमएस पाठवून आपला निकाल कळू शकेल. आयडिया, वोडाफोन, एअरसेल, रिलायन्स, युनिनॉर या कंपन्यांच्या मोबाइलवरून MH १० (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवल्यावर निकाल कळणार आहे. एअरटेल मोबाइलवरून निकाल पाहण्यासाठी MH १० (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५२७०११ या क्रमांकावर पाठवायचा आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
http://www.mahresult.nic.in
http://www.maharashtraeducation.com
http://www.rediff.com/exams
http://www.knowyourresult.com/MAHSSC

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc results declared