पुणे : गुप्तांगात सोने लपवून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर पकडले. तिच्याकडून २० लाख ३० हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. महिलेने सोन्याची भुकटी कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविल्याचे उघडकीस आले आहे. सीमाशुक्ल विभागाने एका ४१ वर्षीय महिलेस अटक केली असून, तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या विमानातून महिला उतरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. त्या वेळी कस्टमच्या पथकाला संशय आला. कस्टमच्या पथकाने तिची चौकशी सुरु केली. कस्टमच्या महिला अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले.  त्यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली.  महिलेकडून २० लाख ३० हजार रुपयांचे ४२३ ग्रॅम ४१ मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman hid gold worth 20 lakhs in her genitals pune print news rbk 25 ysh