Three arrested for demanding ransom in the name of Mathadi organization | Loksatta

पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणारे तिघे गजाआड

आरोपींनी व्यावसायिकाकडे एक लाख २६ हजार रुपये खंडणीची मागणी केली होती. माॅलमधील साहित्याची ने-आण करणाऱ्या गाड्या अडवून आरोपींकडून त्रासही देण्यात आला.

crime news
पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकावर हल्ला करणारे जेरबंद (प्रातिनिधिक छायाचित्र)

माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. संकेत दिलीप गवळी (वय २९, रा. सुखवाणी राॅयल, विमाननगर), अरुण शंकर बोदडे (वय ४८, रा. भैरवनगर, धानोरी रस्ता), नितीन एकनाथ कांबळे (रा. लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा– पुणे : दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील तीन मृतांचे पुन्हा शवविच्छेदन

विमाननगर भागातील ॲरो माॅलमधील साहित्य उचलण्याचे काम एका व्यावसायिकाकडे देण्यात आले होते. हे काम आमच्या माथाडी संघटनेकडून करण्यात येणार आहे, असे सांगून आरोपी गवळी, बोदडे, कांबळे यांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितली हाेती. माॅलमधील साहित्याची ने-आण करणाऱ्या गाड्या आरोपींनी अडवून त्रास देण्यात आला.

हेही वाचा- पुण्याच्या कचरा डेपोतील कचऱ्यातून सौरऊर्जा; दैनंदिन ३०० ते ४०० युनिट निर्मिती

व्यावसायिकाकडे एक लाख २६ हजार रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती. याबाबत खंडणी विराेधी पथकाकडे तक्रार देण्यात आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा लावला. कांबळे, बोदडे, गवळी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 10:22 IST
Next Story
पुणे : दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील तीन मृतांचे पुन्हा शवविच्छेदन