पुण्याच्या देहूत जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा बिजोत्सव पार पडत आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळं बिजोत्सवावर अनेक निर्बंध होते. परंतु, यावर्षी करोना आटोक्यात आल्याने वारकऱ्यांना देहूत प्रवेश देण्यात आला असून ‘याची देही, याची डोळा’ हा सोहळा पाहण्यास मिळत आहे. देहू नगरी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून गेली असून ३७४ वा सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वर्षांनंतर देहूनगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बिजोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. यावर्षी करोनाचे निर्बंध शिथिल झाले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झाले आहेत. दर्शन रांग तसेच इतर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

दरवर्षीपेक्षा अधिक संख्येने वारकरी देहूत दाखल झाल्याने देहू तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. संत तुकाराम महाराज संस्थान कडून बिजोत्सवानिमित्त मंदिरावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. तसेच, फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती. याचे विहंगम दृश्य हे ड्रोन कॅमेऱ्यातून संस्थांकडून टिपण्यात आले आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tukaram maharaj bijostav dehu kjp 91 hrc