लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: नगर रस्त्यावर केसनंद परिसरात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन मोटारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले.

मयूर भाऊसाहेब बहिरट (वय २५, रा. केसनंद, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात योगेश केंजळे , सर्जेराव माने, किरण गावडे, अजय जाधव जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली. मोटारचालक मयूर केसनंद-बकोरी रस्त्याने निघाला होता. त्या वेळी दुसऱ्या मोटारीतून चौघेजण नगरहून पुण्याकडे निघाले होते. भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाली. अपघातात मयूर याचा जागीच मृत्यू झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two cars collide head on on the nagar road one die four injured pune print news rbk 25 mrj