पुणे : दुचाकी चोरट्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. महेश उर्फ मायकल नवनाथ कांबळे असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा – पुणे – सोलापूर रस्त्यावर यात्रेहून परतणाऱ्या बसचा अपघात; ११ प्रवासी गंभीर जखमी

हेही वाचा – “पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत तूर्तास मी चर्चा घडवणार नाही, तुम्हीही घडवू नका”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

कांबळेने चंदननगर भागातून एक दुचाकी चोरली होती. त्याच्या विरुद्ध चंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. योगेश कदम यांनी बाजू मांडली. न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून कांबळेला आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पाेलीस उपनिरीक्षक संतोषकुमार माने यांनी तपास करून कांबळेच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी सहाय केले.