महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून एसएनडीटी परिसरात फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या बुधवारी (१ मार्च) करण्यात येार आहे. त्यामुळे बुधवारी कर्वेनगर, कोथरूड, डेक्कनसह अन्य भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी (२ मार्च) दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>कसबा पोटनिवडणूकीत चर्चेत असलेल्या ‘पुण्येश्वर मंदिर’चा नेमका इतिहास काय आहे?

प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्ता, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयूर काॅलनी, डेक्कन परिसर, कोथरूड, संगम प्रेस रस्ता, करिष्मा सोसायटी, हॅपी काॅलनी, सहवास सोसायटी, कर्वेनगर परिसर, म्हात्रे पूल ते राजाराम पूल परिसर, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी, कर्वे पुतळा परिसर, आयडियल काॅलनी परिसर, पौड रस्ता, भांडारकर रस्ता, एसएनडीटी परिसराचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.