बारामती: बारामती शहरातील रेल्वे स्टेशन नजीक मेहता हॉस्पिटल पासून काही अंतरावर असलेल्या लोहमार्गावर रेल्वे खाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही, आज दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना  घडली. बारामती शहरातून दौंड कडे निघालेला रेल्वे गाडीखाली महिला सापडल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान,या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ती साधारण ३० ते ३५ वयोगटातील असावी , या महिलेची ओळख पटवण्याकरिता पोलीस तपास करीत आहेत. बारामती रेल्वे स्टेशन नजीक लोहमार्गावर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून ही आत्महत्या आहे की अपघात आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत,

बारामती शहरातील रेल्वे स्टेशन नजिक लोहमार्गावर रेल्वे येण्या जाण्याच्या वेळेत यापूर्वी सुद्धा अशा अनेक अपघात आणि घटना घडल्या असून या घटनांमध्ये  काही जणांचा मृत्यू झालेला आहे, हा अपघात आहे की आत्महत्या ? हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होणार असले तरी रेल्वे लोहमार्गावर नजीकच्या काळात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी पोलीस तपास करीत असून हा अपघात की आत्महत्या ? याचा ते शोध घेत आहेत, या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मयत महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांना तपासामध्ये वेग घेता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अपघाता दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी इथे दिसून आली असून मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed after being hit by train in baramati pune print news snj 31 amy