पुणे : शहरातील कोंढवा, येरवडा आणि शिवाजीनगर भागात शुक्रवारी दुपारी चार ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. कोंढवा परिसरातील येवलेवाडीत सोफा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात आग लागल्याने गंभीर भाजलेल्या एकाचा मृत्यू झाला. कोंढव्यातील येवलेवाडी भागात सोफा निर्मिती करणारा कारखाना आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कारखान्यात आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. कारखान्यात ठेवलेल्या एका छोट्या सिलिंडरचा स्फोट झाला होता. कारखान्यात वेल्डिंगचे काम करण्याचे काम सुरु असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुण्यात चिमुकली बनली सर्वांत कमी वयाची मूळ पेशीदाता! २१ महिन्यांच्या मुलीच्या दानामुळे बहिणीला जीवदान

जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्यातील कामगार हरुण अहमद खान (वय ४५) हे गंभीर होररळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.दुसऱ्या एका घटनेत कोंढव्यातील मीठानगर परिसराात एका इमारतीच्या आवारात असलेल्या रोहित्राने पेट घेतल्याची घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही. दुपारी तीनच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील संचेती रुग्णालयाजवळ बंद असलेल्या एका जून्या लाकडी घराला आग लागल्याची घटना घडली. आगीमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

हेही वाचा >>> कौतुकास्पद: पोलिसांसाठी आता ‘पोलीस दवाखाना’; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात आग

येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात दाट लोकवस्ती असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा आणि धानोरी अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker dies in fire at sofa manufacturing factory in yewalewadi pune print news rbk 25 zws