Workers on hunger strike in Pimpri admitted to hospital pune print news ysh 95 | Loksatta

पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल

डायचंड इंडिया सीट कंपनीतील कामगार विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून पिंपरीत उपोषणाला बसले असून, त्यापैकी काही कामगारांची प्रकृती बिघडली आहे.

पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

पिंपरीः डायचंड इंडिया सीट कंपनीतील कामगार विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून पिंपरीत उपोषणाला बसले असून, त्यापैकी काही कामगारांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कंपनीत महिंद्राच्या गाड्यांची आसने तयार केली जातात. कंपनीत कायम कामगार नसून कंत्राटी कामगार भरण्यात आले आहेत. या कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा >>> केंद्र व राज्यातील सरकार मूर्खपणाच्या बळावर; ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांचे भाष्य

यासंदर्भात भोसले म्हणाले, कंपनीत कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगार म्हणूनच कामगारांची भरती केली आहे. त्यांना कोणत्याही सोयी सवलती दिल्या जात नाहीत. पगारवाढ देण्यात आलेली नाही. कंपनीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीची युनियन स्थापन होतात. कामगारांना धमकी देण्यास सुरुवात झाली असून, या संदर्भात महाळुंगे पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:06 IST
Next Story
केंद्र व राज्यातील सरकार मूर्खपणाच्या बळावर; ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांचे भाष्य