पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी रेल्वे स्थानका जवळ एका २५ वर्षीय तरुणाने रेल्वे इंजिन समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना साडे तीनच्या सुमारास घडली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या पिवळ्या रेल्वे इंजिनच्या समोर २५ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा तरुण रेल्वे इंजिन तारा दुरुस्तीचे, तसेच रेल्वे रुळाचे काम करत असे. तरुणाच्या डोक्याला रेल्वे इंजिनच्या अपघातात गंभीर जखम झाली होती त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अद्याप तरुणाची ओळख पटली नसून निळी रंगाची जीन्स, चौकडा शर्ट, पांढरी बनियान, रंग सावळा. असे या २५ वर्षीय तरुणाचं वर्णन आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man commits suicide in front of train