पुणे : प्रेमसंबंघाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सुखसागरनगर परिसरात घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषीकेश दीपक खोपडे (वय २६, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रणव प्रशांत जगताप (वय २५, रा. बिबवेवाडी), सार्थक संतोष भोर (वय २१, रा. धनकवडी), कुमार तुळशीराम भागवत (वय २४), अमर अशोक लोंढे (वय २०, दाेघे रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपडे याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास खोपडे सुखसागनर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी जगताप, भोर, भागवत, लोंढे यांनी खोपडेला अडवले. त्याला लाथाबुक्क्यांनी, तसेच दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत खोपडे गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. खोपडे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth brutally beaten up on suspicion of love affair four arrested for attempted murder pune print news rbk 25 ssb