नारायणगाव : दुचाकी वरून चाललेल्या तरुणाच्या दुचाकीवर झडप घेऊन पाठीमागे बसलेल्या युवकाला बिबट्याने जखमी केले . हि घटना जुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथे गुरुवारी (दि.६) रात्री ८ वा. घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप कुलवडे व साहिल डोंगरे हे ओतूर वरून रोहोकडी येथील महालक्ष्मीरोड ते गावठाण रस्त्यावरून मोटार दुरूस्तीसाठी जात असताना आढपांधी येथील शांताराम मुरादे यांच्या घराजवळ रस्त्याच्याकडेला असलेल्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला . मागे बसलेल्या साहिल लक्ष्मण डोंगरे (वय १९ ) रा. उदापूर याला जखमी केले आहे . याचवेळी मागून आलेल्या दुचाकीवरील तरुणांनी व स्थानिकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने पलायन केले . या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रूपाली जगताप, वैभव वाजे, फुलचंद खंडागळे व टीमने घटनास्थळी येऊन डोंगरे यास तात्काळ ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे रवाना केले आहे . रोहोकडी येथे हल्ला आलायडर मशीन बसविण्यात आली आहे . रिस्को टीम या भागात गस्त घालणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth was injured by a leopard in rohokadi junnar taluka pune print news amy