शुभा प्रभू-साटम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
ब्रेड, पालकाची जुडी, उकडलेला बटाटा, चीझ, लसूण, पिझ्झा मसाला, मेयोनिज, पुदिना-मिरची चटणी, मिरपूड, साखर, मीठ
कृती
पालक धुऊन चिरून घ्यावा. उकडलेला बटाटा कुस्करावा. चीज किसून घ्यावे. आता हे तिन्ही जिन्नस एकत्र करावे. यामध्ये लसूण ठेचून घालावा. त्यात पिझ्झा मसाला, साखर, मीठ, मिरपूड, मेयोनिज घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून ब्रेडला लावून घ्यावेत. त्यावर पुदिन्याची चटणी लावलेली दुसरी स्लाइस लावून छान भाजून घ्यावे.
हे झाले, चीज-पालक-बटाटा सँडविच तयार!
स्लाइसमधल्या सारणामध्ये आवडत असल्यास तुम्ही ड्राय हब्र्ज, चाट मसाला हेसुद्धा वापरून त्याची चव आणखी वाढवू शकता.
First published on: 01-11-2018 at 03:01 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheese spinach potato sandwich recipe