Gulab Pakode Recipe : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत असतो तर कधी गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी कोणी मजेशीर रील करतो तर कधी कोणी आश्चर्यचकीत करणारे स्टंट करताना दिसतो. कधी कोणी भन्नाट जुगाड करताना दिसतो तर कधी हटके रेसिपीचे व्हिडीओ शेअर करतो.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गुलाबाचे पकोडे बनवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

तुम्ही आजवर गुलाबाचे फुल प्रियजनांना भेटस्वरुप दिले असेल, केसामध्ये माळले असेल, किंवा देवाला अर्पण केले असेल पण तुम्ही कधी गुलाबाच्या फुलाचे पकोडे खाल्ले आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की, गुलाबाचे पकोडे कसे बनवतात? त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.

हेही वाचा : Manchurian Paratha: नाश्त्याला करा चविष्ट ‘मंच्युरियन पराठा’ ; पौष्टीक पदार्थ फक्त दहा मिनिटांत बनवा; रेसिपी लिहून घ्या

गुलाबाचे पकोडे कसे बनवतात?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विक्रेता दिसेल. तो त्याच्या गाड्यावर गुलाबाचे पकोडे बनवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला सुरुवातीला दिसेल की की हा विक्रेता फांदीपासून गुलाबाचे फुल तोडतो. त्यानंतर हे गुलाबाचे फुल स्वच्छ पाण्याने धुतो. त्यानंतर तो एका भांड्यामध्ये बेसन घेतो आणि त्यात मसाला टाकतो. त्यानंतर पाणी टाकून बेसन घट्ट असे भिजवून घेतो. त्यानंतर या बेसनामध्ये गुलाबाचे फुल बुडवून गरम तेलामध्ये तळतो.

गुलाबाचे पकोडे कुरकुरीत तळल्यानंतर बाहेर काढतो आणि त्यानंतर ग्राहकांना सर्व्ह करतो. ग्राहक आवडीने हे गुलाबाचे पकोडे खाताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या

blessedindianfoodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रोझ पकोडा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “मुलीला गुलाब देऊ की गुलाबाचे पकोडे देऊ?” तर एका युजरने लिहिलेय, ” हा व्हिडीओ पाहून कळले की गुलाबाच्या फुलाला काटे का असतात?” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा तर गुलाब वडा आहे” अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली नाही. काही युजर्सनी कमेंटमध्ये नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.