How To Make Masoor Dal Bhaji : सकाळी उठायचा आपल्यातील प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यातच सकाळचा मोबाईलमध्ये वाजलेला अलार्म बंद करून आपण पुन्हा झोपलो की, मग उशीर हा होतोच. त्यातच स्वतःच यावरून काही जणांना डब्बा सुद्धा करायचा असतो. मग अशातच झटपट होणारी एखादी भाजी कोणती बनवायची असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण – आज आम्ही तुमच्यासाठी एका खास भाजीची रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे अगदी कमी वेळेत तुमच्या टिफिनसाठी भाजी तयार होईल. तर या रेसीपीचे नाव आहे अक्खा मसुर डाळीची भाजी…

अक्खा मसूर डाळीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Akkha Masoor Dal Bhaji Ingredient) :

अक्खा मसुर डाळ, दोन कांदे, एक टोमॅटो, कोथिंबीर, कडीपत्ता, राई-जिरे, मसाला, मीठ, हळद, तेल, पाणी.

अक्खा मसूर डाळीची भाजी बनवण्याची कृती (How To Make Akkha Masoor Dal Bhaji ) :

  • सकाळी उठल्यावर वाटीभर अक्खा मसुर डाळ धुवून घ्या आणि पाच मिनिटे भिजत घाला.
  • कांदा आणि टोमॅटो कापून घ्या.
  • कढईत तेल घाला.
  • मग त्यांत राई-जिरे, कडीपत्ता आणि मग त्यात कांदा, टोमॅटो घाला.
  • नंतर दीड चमचा मसाला, मीठ, हळद घाला आणि थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर भिजत ठेवलेली अक्खा मसुरूची डाळ त्यात घाला.
  • अगदी थोडंसं पाणी घाला.
  • अशाप्रकारे तुमची अक्खा मसुर डाळीची भाजी तयार.

मसूरच्या डाळीचे फायदे (Health benefits of Masoor Dal) :

मसूरच्या डाळीत प्रोटीनचा साठा मुबलक असतो ज्यामुळे मांसपेशी व हाडांना मजबुती मिळू शकते.डायबिटीजच्या रुग्णांसाठी मसूर ब्लड शुगर करण्यात मदत करतात.फायबरयुक्त मसूरडाळ पचनप्रक्रिया वेगवान करण्यास मदत करते. मसूर डाळीत कमी फॅट्स असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास सुद्धा मदत होते.