Video Shows How To Make Batatyache Crispy Kaap : बटाटे विकत घेताना अधिक प्रमाणात घेतले जातात आणि हे प्रमाण बघता काही वेळा हेच बटाटे साठवून ठेवताना अडचणी येऊ लागतात. मग ठेवून ठेवून हे बटाटे खराब होतात. तर तुमच्याकडेही भरपूर बटाटे उरलेले असतील आणि तुम्ही नेहमी भाजी, भजी, कोफ्ता, काप खाऊन कंटाळा आला असेल. तर आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य (Batatyache Crispy Kaap ingredients) :

  • ३ बटाटे पातळ कापलेले
  • १ चमचा तेल
  • १ चमचा लाल मिरची पावडर
  • चवीनुसार मीठ

कृती (How To Make Batatyache Crispy Kaap) :

  • बटाटे पातळ कापून घ्या.
  • १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • हे काप एका कापडावर पसरवून ठेवा.
  • नंतर एका भांड्यात बटाट्याचे काप घ्या. त्यात तेल, मीठ आणि तिखट घाला.
  • एअरफ्रायर / बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.
  • १९० अंश सेल्सिअसवर १२ ते १५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत एअरफ्राय करा.
  • त्यानंतर एका हवाबंद डब्यात ठेवा.
  • आठवडाभर तुम्ही या स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @picklesandwine या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.जर घरात बटाटा असेल तर कधीच जेवायला काय करू किंवा रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय असं म्हणण्याची वेळ येईल तेव्हा नक्की हा मसालेदार, चटपटीत पदार्थ घरी बनवून ठेवा आणि नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या खाऊच्या डब्याला द्या. बटाट्यापासून असंख्य रेसिपी बनवता येतात. नेहमी भाजीत, भातात, आमटीत, रस्स्यात, बेसनाच्या पोळ्यात सहकलाकाराची भूमिका निभावणाऱ्या या बटाट्याला थोडा क्रिस्पी टच देऊन तुम्ही हा नवीन पदार्थ बनवू शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make batatyache crispy kaap watch viral video and try ones at your home asp