Green Soup Recipe in Marathi : सध्या बाजारात रेडिमेड सूप्सची पाकिटं मिळत असल्याने घरी सूप बनवणे फारचं कमी झाले आहे. पण, सध्याचे वातावरण पाहता बाहेरचे, पाकीटबंद रेडिमेड सूप्स आपल्यासाठी खरोखरच फायदेशीर असतात का याचा सुद्धा विचार करणे महत्वाचे आहे. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर स्वतःसाठी किंवा मुलांना शाळेतून घेऊन घरी आल्यावर त्यांना काहीतरी रुचकर, चविष्ट असं खायला द्यायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसीपीचे नाव आहे ग्रीन सूप (Green Soup).

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१. पंधरा-वीस पालक (बारीक चिरलेली)
२. अर्धी वाटी मटार (दाणे ठेचून घ्या)
३. चार ढोबळ्या मिरच्या (आतील बिया, देठ काढून घ्या)
४. आलं
५. लिंबाचा रस
६. एक चमचा लोणी
७. दोन ते तीन चीज क्युब्सचा खीस
८. फेटलेली मलई
९. क्रोटन्स
१०. मीठ, साखर

हेही वाचा…Raw Banana Recipe : कच्च्या केळीपासून बनवलेला हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? मग रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती :

१. गॅसवर एक टोप ठेवा, त्यात तीन ते चार कप पाणी घाला.
२. त्यात पालक, मटारचे दाणे, मिरच्यांचे तुकडे, आले, मीठ घालून नरम शिजवून घ्या.
३. शिजवून घेतल्यानांतर मिक्सरममध्ये फिरवून घ्या.
४. नंतर प्लास्टिकच्या गाळणीतून मिश्रण गाळून घ्या.
५. मंद गॅसवर हे सूप ठेवून त्यात लोणी, चीजचा किस घालून एक उकळ काढावी.
६. सूप वाढताना प्रत्येक बाऊलवर थोडी-थोडी फेटलेले मलई, पाच ते सहा क्रोटन्स घालून द्यावे.
७. अशाप्रकारे तुमचे गरमागरम ग्रीन सूप (Green Soup) तयार.

(टीप : तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे सर्व भाज्यांचे सूप (Green Soup)बनवू शकता )

मटार खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

मटार (वाटाणा) ही एक भाजी आहे जी पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. मटारचा उपयोग भाज्या, पुलाव शिजवण्यासाठी करतात. वाटाणा ही अशीच एक भाजी आहे जी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.मटारमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.भरपूर फायबर असलेले मटार खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक कमी होते. हे खाल्ल्यानंतर तुम्ही जास्त खाणे टाळाता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make easy super greens soup at home note down the recipe in marathi asp