Video Shows Home Made Fry Bhendi Recipe : आपल्याकडे असं म्हणतात की जगात दोन पद्धतीची लोक असतात, एक म्हणजे ज्यांना भेंडीची भाजी खूप आवडते आणि दुसरे म्हणजे ज्यांना भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही. पण, भरलेली भेंडी बनवली की, हीच मंडळी अगदी आवडीने खातात. त्यामुळे भेंडी थोड्या हटके पद्धतीत बनवली की, प्रत्येक जण आवडीने खातात. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ(Video) व्हायरल होतो आहे, यामध्ये भेंडीची अगदी चविष्ट रेसिपी दाखवण्यात आली आहे, जी तुम्हाला चिकन क्रिस्पी विसरायला भाग पडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१. भेंडी

२. मैदा

३. कॉर्न स्टार्च

४. बेकिंग पावडर

५. लाल मिरची पावडर

६. लसूण

७. गोचूजंग (कोरियन मिरची पेस्ट)

८. टोमॅटो सॉस

९. चिली फ्लेक्स

१०. पाणी

११. मध

१२. तीळ

१३. मीठ

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. भेंडीच्या कडा कापून मध्यभागी चिरून घ्या.

२. एक कप मैदा, १/२ कॉर्न स्टार्च, एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर वापरून ओले आणि थोडे कोरडे पीठ सुद्धा बनवून घ्या.

३. मधोमध चिरून घेतलेल्या भेंडीला प्रथम ओल्या पिठात कोट करा आणि नंतर कोरड्या पिठात कोट करून घ्या.

४. सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या किंवा एअर फ्राय सुद्धा करू शकता.

५. सॉससाठी कढईत चिरलेला लसूण घालून तिळाचे तेल घाला. नंतर त्यात १ चमचा गोचूजंग (कोरियन मिरची पेस्ट), १ चमचा टोमॅटो सॉस, १/२ चमचा मध, चिली फ्लेक्स आणि त्यात २ चमचे पाणी घाला.

६. नंतर त्यात तळलेली भेंडी घालावी.

७. मिक्स करून घ्या आणि वरून तीळ घाला.

८. अशाप्रकारे कोरियन भेंडी फ्राय (Korean fried bhindi) तयार.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @polosjunkjournal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आपल्यातील अनेक जण भेंडीची भाजी खाऊन नक्कीच कंटाळले असतील. तर थोडा बदल म्हणून तुम्ही कोरियन भेंडी फ्राय एकदा बनवून पाहा आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make korean fried bhindi watch viral video and read recipe in marathi asp