पिठलं असं नुसतं म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो तव्यावर केलेला झुणका असो किंवा कांदा घालून केलेलं पातळ पिठलं. ऐनवेळी घरात भाजी नसेल की पोळी किंवा भाकरीशी आणि भाताशीही खायला मस्त लागणारं हे पिठलं म्हणजे मराठी घरांमधील एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय. रात्रीच्या वेळी भाजी आणि आमटी अशा दोन गोष्टी न करता झटपट एकच काहीतरी करायचं असेल किंवा गावाहून आल्यावर पटकन घरात भाजी नसताना काय करावं असा प्रश्न असेल तर होणारा हा झक्कास पदार्थ करण्याच्या तीन आगळ्यावेगळ्या रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

झुणका साहित्य –

  • तेल – ३ ते ४ टेबलस्पून
  • जिरे – १ टेबलस्पून
  • मोहोरी – १ टेबलस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • लसूण पाकळ्या – ४ ते ५ (बारीक चिरुन घेतलेल्या)
  • कांदा – १ कप (बारीक चिरुन घेतलेला)
  • कांद्याची पात – १/२ कप (बारीक चिरुन घेतलेली)
  • बेसन – १ कप
  • पाणी – अर्धा कप
  • कोथिंबीर – १ टेबलस्पून
  • लाल तिखट मसाला – १ टेबलस्पून

झुणका कृती –

  • सर्वप्रथम एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहोरी, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी.
  • आता या फोडणीत बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, लाल तिखट मसाला घालून घ्यावा.
  • त्यानंतर त्यात बेसन पीठ घालावे, बेसन घातल्यानंतर ते २ ते ३ मिनिटे चांगले भाजून फोडणीमध्ये एकजीव करुन घ्यावे.
  • आता हाताच्या ओंजळीत थोडे थोडे पाणी घेऊन ते या झुणक्यामध्ये सोडावे.
  • मग झुणक्याचे छोटे छोटे गोल गठ्ठे होईपर्यंत झुणका शिजवून घ्यावा.

हेही वाचा – Vegetable Dalia recipe: नाश्त्यासाठी बनवा व्हेजिटेबल दलिया, टेस्ट सोबत मिळेल पोषण!

  • सगळ्यात शेवटी झुणक्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून हा गरमागरम झुकणा भाकरी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.