Mixed Dal Kheer : हेल्दी आहार हा नेहमी चांगल्या आरोग्यासाठी गरजेचा आहे. जर आहारात धान्य असणे आवश्यक आहे. नाचणी, मुगाची भरड आरोग्यासाठी चांगले असतात. नाचणी खाल्याने हाडे मजबूत राहतात आणि हिमोग्लोबिन वाढते तर मूग डाळ ही कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ओळखली जाते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
आज आपण नाचणी, मुगाची भरड अशा मिश्र धान्यांची खीर कशी करायची? याविषयी जाणून घेणार आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : Spinach Tofu Cutlets : असे बनवा टेस्टी पालक टोफू कटलेट्स; पटकन नोट करा रेसिपी
साहित्य –
- नाचणी
- राजगिरा
- मुगाची भरड ३ चमचे
- अर्धा कप दूध
- खसखस पाव चमचा
- गाजर किसून २ चमचे
- २-३ चमचे ओला नारळ
- खजूर पेस्ट/ खारीक पावडर
- तूप १ चमचा
- रताळे किसून ४ चमचे
- चवीपुरती साखर/ गूळ. (शक्यतो गूळ व खारीक पावडर वापरा.)
- वेलची- जायफळ पूड
हेही वाचा : हेल्दी इंद्रधनुष्यी चाट कधी खाल्ली का? मग एकदा ट्राय कराच, जाणून घ्या रेसिपी
कृती –
- तुपावर भरड भाजून, त्यात रताळे व गाजर कीस घाला.
- त्यात थोडे पाणी घालून शिजवा.
- मग त्यात दूध, ओला नारळ घालून शिजवा.
- नंतर वेलची जायफळ, खसखस घालून उकळी आणा.
- खीर तयार होईपर्यंत सतत चमच्याने ढवळत रहा, म्हणजे दूध फाटत नाही.
First published on: 09-06-2023 at 16:23 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make mixed dal kheer recipe healthy food for healthy lifestyle ndj