How To Make Palak Omelette For Breakfast Helps In Weight Loss | Loksatta

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी ‘पालक ऑम्लेट’; जाणून घ्या झटपट रेसिपी

Palak Omelette Recipe: पालक ऑम्लेट टेस्टी असण्यासोबतच चविष्ट देखील असते. पालक ऑम्लेट नाश्त्यासाठी एक परिपूर्ण पदार्थ आहे. गुणांनी युक्त पालक ऑम्लेट खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया पालक ऑम्लेट बनवण्याची सोपी रेसिपी.

palak omlette recipe
photo: freepik

पालक ऑम्लेट रेसिपी (Palak Omelette Recipe): अनेक घरांमध्ये सकाळी नाश्त्यासाठी ऑम्लेट तयार केले जाते. अंड्याचे ऑम्लेट खायला अनेकांना आवडते. जर तुम्हाला ऑम्लेट अधिक आरोग्यदायी बनवायचे असेल तर तुम्ही पालक ऑम्लेट तयार करू शकता. चविष्ट असण्यासोबतच पालक ऑम्लेट खूप आरोग्यदायी देखील आहे. प्रथिने आणि लोहाने समृद्ध पालक ऑम्लेट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते वजन कमी करण्यास देखील मदत करते. पालक ऑम्लेटची रेसिपी खूप सोपी आहे आणि ती काही मिनिटांत बनवता येते. तुम्हाला हवे असल्यास मुलांच्या जेवणाच्या डब्यात पालक ऑम्लेटही देऊ शकता.
साध्या ऑम्लेट ऐवजी जर तुम्ही यावेळी पालक ऑम्लेट बनवण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला याची झटपट रेसिपी सांगणार आहोत.

पालक ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य

  • अंडी – ३
  • कांदा – १
  • चिरलेले आले – १/४ टीस्पून
  • लसूण चिरलेला – १/४ टीस्पून
  • बारीक चिरलेला पालक – ४ चमचे
  • हिरवी मिरची – १
  • लाल तिखट – १/४ टीस्पून
  • हळद – १ चिमूटभर
  • गरम मसाला – १/२ टीस्पून
  • तेल – २ चमचे
  • मीठ – चवीनुसार

( हे ही वाचा: वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी)

पालक ऑम्लेट बनवण्याची कृती

पालक ऑम्लेट बनवण्यासाठी प्रथम कांदा, पालक, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. यानंतर आले आणि लसूणचेही छोटे तुकडे करा. आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यात तेल टाका आणि मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची, हिरवी धणे, लसूण टाका. सुमारे 1 मिनिट ढवळत असताना ते तळून घ्या. यानंतर कढईत बारीक चिरलेला पालक टाका आणि चमच्याने मिक्स करून शिजवून घ्या. पालक सुमारे २ मिनिटे शिजवा. यानंतर त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून थोडा वेळ परतून घ्या. दरम्यान, एका भांड्यात अंडी फोडा आणि त्यांना चांगले फेटून घ्या. आता पॅनमध्ये आणखी एक चमचा तेल टाका आणि नंतर वर फेटलेले अंडे घालून शिजवून घ्या. थोडावेळ शिजल्यानंतर ऑम्लेट पलटून दुसऱ्या बाजूने शिजू द्या. ऑम्लेट बनवायला २-३ मिनिटे लागतील. यानंतर, गॅस बंद करा आणि पालक ऑम्लेट प्लेटमध्ये काढा. चविष्ट आणि पौष्टिक पालक ऑम्लेट नाश्त्यासाठी तयार आहे.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:50 IST
Next Story
Video: मिरची कापल्यावर हाताची आग होते? जाळ घालवण्यासाठी पाहा ‘हे’ ५ स्मार्ट उपाय