Phulka Roti: सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार, गोड पदार्थांच्या रेसिपी चर्चेत येतात. आज आपण पोळीच्या एका प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोळीच्या एका प्रकाराविषयी माहिती सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
“स्वयंपाक करायचं म्हटलं की आधी पोळी यायला हवी. पण या पोळीचे किती प्रकार आहेत. फुलका, चपाती, घडीची पोळी, पराठा, रुमाली पोळी इत्यादी. पण पोळ्यांचे हे प्रकार शिकायचे असेल तर सुरुवात मात्र फुलक्यांनीच करावीत. कारण हा पोळीचा सर्वात सोपा प्रकार आहे. त्यामुळे आज आपण हाच फुलका कसा करावा, हे जाणून घेणार आहोत.

  • सुरुवातीला दोन कप गव्हाचे पीठ घ्यावे.
  • अर्धा चमचा मीठ, एक छोटा चमचा तेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी घ्यावे.
  • पिठामध्ये मीठ घाला आणि मिक्स करा. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्या.
  • थोडं पीठ एकत्र करा आणि त्यानंतर पाणी घाला. ज्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो.
  • खूप जास्त सैल कणीक भिजवू नये.
  • थोडीशी घट्ट आणि नरम अशी कणीक भिजवावी. त्यानंतर थोडं तेल या कणीकला लावून पाच मिनिटे पीठ पुन्हा मळून घ्यावे.
  • पीठ जितके मऊ असेल तितके फुलके चांगले होईल.
  • त्यानंतर हे मळलेले पीठ अर्धा तासासाठी झाकून ठेवावे.
  • अर्धा तासानंतर कणीकला अर्धा चमचा उरलेले तेल लावून पीठ मळून घ्यावे.
  • तुम्हाला ज्या आकाराचा फुलका पाहिजे त्या आकाराचा गोळा करावा.
  • या गोळ्याला चांगले मळून घ्या आणि पीठ लावून हलक्या हाताने गोळा लाटावा.
  • कडेकडेला लाटून घ्यावा. गोळा थोडा मोठा झाला की तो आपोआप फिरतो.
  • गरज पडली तर थोडे पीठ लावावे.
  • गॅसवर तवा ठेवा.
  • तवा साधारण गरम झाला की त्यावर हा लाटलेली पोळी टाकावी.
  • एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पूर्ण भाजून घ्यावी. त्यानंतर हा फुलका थेट गॅसवर भाजून घ्यावा. फुलका खूप छान फुगतो.
  • ज्यांना गॅसवर फुलका भाजायची भीती वाटते ते तव्यावर सुद्धा भाजू शकता. फक्त शेवटी गॅसवर न भाजता फुलक्याच्या पहिल्या बाजूला कडे कडेला सुती कपड्याने किंवा चमच्याने प्रेस करा. फुलका छान फुगेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

Vaishalis Recipe या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फुलका (रोटी) पहिल्यांदाच करणाऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान, मला फुलके करायला खूप आवडतात” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात परफेक्ट फुलका” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई तू खूप छान समजावून सांगितलं मला तुझी रेसिपी खूप आवडली. खूप सोप्या पद्धतीने केली. खूप आवडली” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आणि त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make phulka or puffing roti read tips to make perfect phulka roti ndj