Khandeshi recipe: जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा वांग्याचं भरीत पुरी”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत पुरी रेसिपी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी खानदेशी वांग्याचं भरीत पुरी कशी करायची

खानदेशी वांग्याचं भरीत पुरी साहित्य

१ मोठा वांग,हिरवी वांगी घेतात पण मला जांभळ वांग मिळालं
१५ कांद्याच्या पाती
८ ते दहा हिरव्या मिरच्या
१ मोठा चमचा शेंगदाणे
१० खोबऱ्याचे काप
१/२ वाटी धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर
१५ कढीपत्त्याची पाने
२ टेबलस्पून शेंगदाणा तेल
१५ लसणाच्या पाकळ्या
चवीमीनुसार मीठ
१/२ चमचा जीरे चिमूटभर हिंग
तळण्यासाठी तेल
२ वाटी कळण्याचे पीठ मीठ व थोडसं तेल
२ वाटी ज्वारी पीठ

खानदेशी वांग्याचं भरीत पुरी कृती

१. सर्वात आधी वांगी धुवून घ्या. त्यानंतर वांग गॅसवर भाजून झाकून ठेवावं. अर्ध्या तासाने त्याची सालं काढून ठेवावी. मिरच्या गॅसवर तव्यावर भाजून घ्याव्या मिरची लसूण व मीठ हे चांगलं ठेचून घ्यावं. त्यामध्ये थोडी कांद्याची पात टाकून तीही ठेचावी मग सोलून ठेवलेलं वांग त्यात टाकून ठेचाव. कोथिंबीर ही घालावी उरलेली कांद्याची पात बारीक कापून ठेवावे.

२. मग गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे शेंगदाणे तळून ते या वरती वरील ठेचलेल्या भरीतमध्ये घालावे. त्याप्रमाणेच खोबऱ्याचे काप हे तळून त्यामध्ये घालावेत उरलेल्या तेलामध्ये झिर हिंग कढीपत्ता घालून फोडणी करून त्यामध्ये कांद्याची पात व दोन मिरच्या उभ्या कापून घालाव्या.

हेही वाचा >> Bitter Guard Recipe: कडू कारल्याची आबंट- गोड भाजी, मुलंही आवडीने खातील

३. दोन मिनिटांनी ही फोडणी भरतामध्ये घालून एकजीव करावे व पाच मिनिटांसाठी बारीक गॅसवर हे सर्व ठेवून ढवळत राहावे.

४. कळण्याच्या पिठामध्ये ज्वारीचे पीठ टाकून त्यात मीठ घालावे व पाण्याने भिजवून त्याच्या पुऱ्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्या. ते या वांग्याच्या भरताबरोबर खावे अतिशय टेस्टी असे खमंग चविष्ट भरीत तयार होते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi recipe khandeshi bharit puri recipe in marathi vangi batata bhaji recipe how to make vangach bharit srk