Mango Lassi Recipe In Marathi: आपल्याकडे उन्हाळा म्हणजे आंबा असं समीकरण आहे. त्यात कोकणी माणसांसाठी आंबा हा त्यांचा जीव की प्राण असतो. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबा आवडीने खाल्ला जातो. काहीजण आंबे खाण्यासाठी म्हणून उन्हाळ्याची वाट पाहत असतात. आंबे पिकल्यावर मार्च-एप्रिल महिन्यात बाजारांमध्ये यायला लागतात.
घरात आंब्याचे शौकीन असल्याने लोक डझनच्या ऐवजी आंब्याची सबंध पेटी खरेदी करतात. काही घरांमध्ये आंबे सोलून खातात. काहींना आंब्यापासून आमरस, आंब्याचं आईस्क्रिम वगैरे पदार्थ तयार करुन खायला आवडतात. पण अशा वेळी आमरसाऐवजी आंब्यापासून नवा पदार्थ बनवून तुम्ही ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया आज मॅंगो लस्सी घरच्या घरी अगदी काहीच मिनिटात कशी करायची.
मॅंगो लस्सी साहित्य
- १०० ग्रॅम मॅंगो पल्प
- ४० ग्रॅम दही
- २-३ टेबलस्पून साखर
- ३-४ बर्फाचे क्यूब्स
मॅंगो लस्सी कृती
मॅंगो पल्प मिक्सर जारमध्ये घेऊन त्यात चविनुसार साखर मिक्स करा.
नंतर त्यात दही व बर्फाचे क्यूब्स मिक्स करून फिरवून घ्या व मँगो लस्सी बनवा.
थंडगार मँगो लस्सी बदाम काप व गुलाब पाकळ्यांनी डेकोरेट करून सर्व्ह करा.