Methi Chutney : जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी जेवणाबरोबर लोणचं, चटणी ही असायलाच हवी. तुम्ही कधी मेथीची चटणी खाल्ली आहे का? हिवाळ्यात मेथी सहज उपलब्ध असते. अशात मेथीचे पराठे, मेथीची भाजी, मेथीचे आळण आपण अनेकदा खातो पण तुम्हाला माहिती आहे का मेथीची चटणी खूप स्वादिष्ट असते.आज आपण मेथीची चटणी कशी बनवायची, हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • मेथी
  • कांदा
  • लिंबू
  • हिरवे मिरचे
  • जिरे
  • कोथिंबीर
  • लसूण
  • आलं

हेही वाचा : Kurkure Recipe : घरीच बनवा पॅकेटसारखे क्रंची कुरकुरे, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मिक्सरमधून बारीक करा.
  • त्यानंतर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि आलं याची सुद्धा मिक्सरमधून बारीक पेस्ट करा आणि मेथीच्या पेस्टमध्ये एकत्र करा.
  • त्यात चवीनुसार मीठ टाका
  • धनेपूड आणि चिमूटभर काळे मीठ टाका
  • भाजलेले शेंगदाणे थोडे बारीक करून त्यात टाका.
  • मेथीची चटणी तयार होईल
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Methi chutney recipe how to make methi chutney food recipe in winter ndj