Kurkure Recipe : लहान मुलांना पॉपकार्न, चिप्स, कुरकुरे यांसारखे पॅकेटचे पदार्थ खायला खूप आवडते. अनेकदा पालकांना माहिती असते की हे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही तरीसुद्धा मुलांचे मन दुखवू नये म्हणून पालक त्यांना विकत घेऊन देतात पण पालकांनो, आता तुम्हाला असे करावे लागणार नाही. कारण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी चटकदार क्रंची कुरकुरे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. तुम्ही घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी कुरकुरे बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

तांदळाचं पीठ
बेसन
मैदा
मीठ
बेकींग पावडर
तेल
लाल मिरची पावडर
चाट मसाला

A power packed Anjeer Milkshake shake that is full of nutrients good health and great for when you want instant energy on the go
Anjeer Milkshake: फक्त ‘या’ ड्रायफ्रूटचं प्या मिल्क शेक; भरपूर कॅल्शियमसह या गोष्टीही शरीराला मिळतील; पाहा सोपी रेसिपी अन् डॉक्टरांचा सल्ला
Important aspects of bike maintenance
बाईक मेंटेनन्सच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष
Weight Loss Drinks
Weight Loss Tips: ‘या’ पेयाने झपाट्याने होईल तुमचे वजन कमी; सेवनाची व बनविण्याची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या…
when a guy show railway ticket to the Police man made him happy
तरुणाने रेल्वे तिकिट दाखवताच पोलिसांच्या चेहऱ्यावर आले हसू, काय होते त्या तिकिटावर? पाहा VIDEO
Tasty Recipe of Pizza Packets
खास मुलांसाठी पिझ्झा पॅकेटची टेस्टी रेसिपी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
mixed vegetable paratha Note the ingredients and recipe
मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात? मग बनवा मिक्स व्हेजिटेबल पराठा; नोट करा साहित्य आणि कृती
Tandoori Paplet fry recipe in marathi
चमचमीत आणि चविष्ठ तंदूरी पापलेट फ्राय; जबरदस्त चव कधीच विसरणार नाही, नक्की ट्राय करा
Oil Free Fish Curry recipe in marathi Fish Curry recipe
ऑईल फ्री फिश करी; एकदा खाल खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

हेही वाचा : Soft Chapati Secret : मऊ लुसलुशीत पोळी कशी बनवावी? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर, जाणून घ्या

कृती

अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्या. त्यात दोन चमचे बेसन घ्या
त्यात एक चमचा मैदा, चवीनुसार मीठ, आणि चिमुटभर बेकींग पावडर टाकावा.
त्यानंतर त्यात पाणी टाकावं आणि सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या. पातळ मिश्रण तयार होईल.
त्यानंतर हे मिश्रण कढईत टाका आणि कमी आचेवर हे मिश्रण शिजवा
हे मिश्रण घट्ट होईल.
त्यानंतर त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे शिजू द्या.
त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. खूप जास्त थंड होऊ देऊ नये.
त्यानंतर या मिश्रणापासून कुरकुरे बनवा आणि नंतर हे कुरकुरे मंद आचेवर गरम तेलातून तळून घ्या.
एका भांड्यात तळलेले कुरकुरे काढू घ्या. या कुरकुऱ्यावर लाल मिरची पावडर, मीठ आणि चाट मसाला टाका. सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
तुमचे कुरकुरे तयार होईल.