Paplet Fish Curry Recipe In Marathi: आपल्याकडे मासे मोठ्या चवीने खाल्ले जातात. माश्यांपासून बनवले जाणारे असंख्य पदार्थ प्रसिद्ध आहेत. यातील एक पदार्थ म्हणजे पापलेट फिश करी. बहुसंख्य लोकांना पापलेट माश्यापासून तयार केलेले पदार्ख खायला आवडत असतात. कोकणामध्ये हा पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ला जातो. कोकणासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पापलेट फिश करी बनवली जाते. अनेकांची ही फेवरेट डिश असते. विकेंडला घरी काहीतरी स्पेशल बनवायचा विचार करत असल्यास तुम्ही घरच्या घरी ही पापलेट फिश करी बनवून घरातल्या सर्वांना खुश करु शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य –

  • पापलेट २ तुकडे
  • आलं-लसूण पेस्ट १ चमचा
  • हळद अर्धा चमचा
  • लाल तिखट पाऊण चमचा
  • मीठ चवीनुसार
  • लिंबू रस १ मोठा चमचा
  • करी बनवण्यासाठी टोमॅटो १
  • अर्धा कांदा
  • सुकं खोबरं दोन चमचे (१० ग्रॅम)
  • लाल तिखट
  • कडीपत्ता, जिरे, हिरवी मिरची
  • गरम मसाला अर्धा चमचा
  • तेल २ चमचे

कृती –

  • पापलेटच्या तुकड्यांना आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, लिंबू रस हे १५ मिनिटांकरिता लावून ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात कांदा रंग बदलेपर्यंत परतवा.
  • त्यात टोमॅटो बारीक चिरून घाला. १० मिनिटे शिजवा.
  • सुकं खोबरं, मसाल्याचे पदार्थ घातल्यानंतर पापलेटचे तुकडे घाला.
  • एक कप पाणी घालून १० मिनिटे मंद आचेवर शिजवा.

आणखी वाचा – घरच्या घरी हॉटेल स्टाईल क्रिस्पी चिली चिकन बनवून Weekend बनवा स्पेशल; लगेच नोट करा रेसिपी

हा पदार्थ खाल्यावर आपल्या शरीराला कॅलरीज – १०० किलो. कॅलरीज, प्रोटीन्स – ९.५ ग्रॅम, फायबर – १.२ ग्रॅम, फोलेट – ४९० मि. ग्रॅम, आयर्न – ०.८ मि.ग्रॅ. हे पोषक घटक मिळतात. फिश करी प्रामुख्याने भातासह खाल्ली जाते. काहीजणांना हा पदार्थ भाकरी किंवा पोळीबरोबर खायला आवडतो.

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paplet fish curry recipe in marathi how to make pomfret fish curry at home as weekend special dish on saturday or sunday know more yps