Dal Takda : वरण हा भारतीय आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आवडीने वरणाचा आस्वाद घेतात. तुम्ही अनेकदा घरी फोडणीचे वरण केले असेल पण आज आम्ही तुम्हाला फोडणीचे वरण बनवण्याची एक हटके रेसिपी सांगणार आहोत. असे फोडणीचे वरण बनवाल तर जिभेवर चव रेंगाळत राहील. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

तुरीची डाळ
मुगाची डाळ
मसूर डाळ
हळद
हिंग
मोहरी
जिरे
लसूण
हिरव्या मिरच्या
कढीपत्ता
टोमॅटो
कोथिंबीर
तेल
मीठ
साखर

हेही वाचा : बटाट्याचे झणझणीत भरीत कधी खाल्ले का? अप्रतिम चवीची ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर त्यात हिंग, हळद टाकून या डाळी शिजून घ्या
डाळी शिजल्यानंतर एक वेगळ्या भांड्यात काढा.
एका कढईत तेल गरम करा
त्यात मोहरी, जिरे, लसणाच्या पाळक्या, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता टाकून चांगले परतून घ्या.
त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून त्यात टाका
त्यानंतर शिजलेली डाळ यात टाका आणि चवीनुसार मीठ टाका.
डाळ घट्ट असेल तर तुम्ही त्यात पाणी टाकू शकता.
तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही चिमुटभर साखर टाकू शकता.
डाळ चांगली शिजवून घ्या आणि शेवटी सर्व्ह करण्यापूर्वी त्यात पुन्हा एकदा कोथिंबीर टाका.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phodniche varan recipe how to make dal takda recipe in marathi food lovers ndj