मुळा हा औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. चवीला तिखट आणि तुरट असलेला मुळा बऱ्याच लोकांना खायला आवडतो. मुळा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे एकुणच तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते. मुळामध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे वजन नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. मुळामधील व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.  मुळ्यामधे टकॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि फायबर असतात ; जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात. सहसा मुळा सहसा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खाल्ला जातो. पण मुळ्याची एक टेस्टी रेसिपी सांगणार आहोत. तुमच्या जसे बटाट्याचे काप करता तसे मुळ्याचे कापही करू शकता. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडले. चला तर मग जाणून घेऊ या ही रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुळ्याचे काप


साहित्य – तेल, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची, हळद, मुळा, मीठ, कांदा लसून मसाला (कांदा लसून – गरम मसाला पर्यायी) आणि कोथिंबीर.

कृती –
मुळ्याचे पातळ काप करा. त्यानंतर एका कढईत तेल जिरे , कढीपत्ता हळद टाका. त्यानंतर कापलेल्या मुळ्याचे काप टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, हवा असल्यास कांदा लसू मसाला टाका. कोथिंबीर आणि मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करा. मुळ्याचे काप तयार आहे. पोळीसह मुळ्याचे काप खाऊ शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील ही भाजी खाऊ शकता.

हेही वाचा- गरमा गरम चविष्ट चीज थालीपीठ खा अन् जीभेचे चोचले पुरवा! ही घ्या रेसिपी

सोशल मीडियावर iampurvishah नावाच्या या अकाऊंटवर हे रेपिसी पोस्ट केली आहे. तुम्ही स्वत: ही रेसिपी बनवून पाहू शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radish recipe mulyache kaap recipe in marathi snk
First published on: 24-03-2024 at 07:05 IST