तुम्हाला नेहमी चमचमीत खायला आवडतं का? मग तुमच्यासाठी आमच्याकडे एक चविष्ट रेसिपी आहे. काहीतरी छान खाण्याची इच्छा झाली की चीज थालपीठ बनवा आणि जीभेचे चोचले पुरवा. तुम्हाला थालपीठ आवडत असेल तर हे रेसिपी देखील नक्की आवडेल. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी बनवयाला सोपी आहे. तुमच्याकडे थालपीठाची भाजणी तयार असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही बाजरी, गहू, ज्वारी आणि बेसन पीठ एकत्र करून झटपट थालपीठ बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या ही रेसिपी.

चीज थालीपीठ साहित्य

बाजरीचे पीठ – अर्धी वाटी
गव्हाचे पीठ – अर्धी वाटी
ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
बेसन – अर्धी वाटी
वाटण -हिरवी मिरची, आल, लसूण, जिरे
ओवा – अर्धा चमचा
तीळ – १चमचे
हळद – १ चमचा
गरम मसाला – १ चमचा
धने पावडर – १ चमचा
दही – २ चमचे
कांदा – १ बारीक चिरुन
मीठ – चवीनुसार
मेथी – बारीक चिरुन
कोथिंबीर – आवडीनुसार
तेल
चीज – १ मोठे पॅकेट

Strawberry Season end due to Water Shortage
पाण्याअभावी स्ट्रॉबेरीचा हंगाम आटोपला
pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी

हेही वाचा – Onion Flower Fritters : कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहेत का? नसेल तर नक्की करून पाहा ही रेसिपी

चीज थालीपीठ कृती

सर्वात आधी एका भांड्यात सर्व पीठ एकत्र करा. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाका. हिरवी मिरची, आले, लसून वाटून टाका. त्यानंतर धने, ओवा. तीळ, हळद सर्वा मसाले टाका. २ चमचे दही, चवीनुसार मीठ, चिरलेली मेथी आणि कोथिंबीर टाकून एकत्र करा. तेल आणि गरजेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या. त्यानंतर त्याचा गोळा करा आणि त्यात चीज टाका. तवा गरम करून त्यावर तेल टाकून त्यावतर तयाप पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने थापा. त्यानंतर तेल टाकून थालपीठ दोन्ही बाजून भाजून घ्या. गरमगरम चीजचे थालपीठ खा.