Chocolate Day 2024 recipes: फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ हा सगळ्याच जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा संपूर्ण आठवडा दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. याच व्हॅलेंटाईन विकला सुरुवात झाली आहे. ‘रोज डे’, ‘प्रपोज डे’नंतर आता सर्व जोडपी ‘चॉकलेट डे’ची वाट बघत आहेत. या दिवशी लव बर्ड्स एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या शुभेच्छाही देतात. आजच्या लेखात आपण “चॉकलेट डे” स्पेशल आपल्या प्रियजनासाठी होम मेड टेस्टी चॉकलेट कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॉकलेटसाठी लागणारे साहित्य :

  • एक वाटी पिठी साखर
  • नारळ तेल किंवा कोकाआ बटर पाऊण कप
  • १ चमचे व्हॅनिला इसेन्स
  • पाव कप दुधाची पावडर
  • पाऊण कप कोको पावडर

होममेड चॉकलेट कृती :

  • सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यावर एक मोठा वाडगा ठेवा, मग त्यात नारळ तेल किंवा कोकाआ बटर घाला.
  • नंतर त्यात साखर, कोको पावडर आणि दुधाची भुकटी घाला. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • जेव्हा ते गुळगुळीत आणि एकधारी दिसू लागतील, तेव्हा आपल्या आवडत्या डिझाइनच्या सिलिकॉन मोल्डमध्ये हे मिश्रण भरा.
  • यासाठी बर्फाचा साचा देखील वापरु शकता. चॉकलेट सेट करण्यासाठी मोल्ड हलक्या हाताने हलवा.
  • यानंतर, तो दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यानंतर प्लेटमध्ये एक एक करून चॉकलेट बाहेर काढा. व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी, तळापासून हलका दाब देऊन चॉकलेट पुढे ढकला.
  • नंतर त्यावर थोडाशी पिठी साखर भूरभुरा. झाले तुमचे होममेड चॉकलेट तयार! आता हे चॉकलेट्स एका छान बॉक्समध्ये पॅक करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीस भेट म्हणून द्या.

हेही वाचा >> एक वाटी दह्याचं चिजी सँडविच होईल कमाल! तव्यावरच ग्रीलसारखे ब्रेड भाजण्यासाठी वापरा हा जुगाड, (Video)

लक्षात ठेवा!

होममेड चॉकलेट मिश्रण बनवण्यासाठी नेहमीच मोठा वाडगा वापरा जेणेकरून ते चांगले मॅश होऊ शकेल. तसेच, बाहेरच्या भांड्यातील पाणी मिश्रणाच्या वाडग्यात अजिबात जाऊ नये. तसेच, जेव्हा आपण चॉकलेट मोल्डमधून बाहेर काढता, तेव्हा काळजीपूर्वक काढा, जेणेकरुन चॉकलेटचा आकार खराब होणार नाही आणि ते तुटणार देखील नाहीत.

चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. ‘डार्क चॉकोलेट’ खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2024 chocolate day 2024 special homemade chocolate recipe in marathi know how to make chocolate at home srk