Mirchi Tomato Thecha Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपी पारंपारिक असतात तर काही रेसिपी नवीन व हटके असतात. सध्या असाच एक हटके रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये झणझणीत मिरची टोमॅटो ठेचा कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठेचा आणि भाकर हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ताटात ठेचा असेल तर जेवणाची चव वाढते. तुम्ही आजवर अनेक प्रकारचे ठेचे खाल्ले असतील. पण तुम्ही कधी मिर्ची टोमॅटो ठेचा खाल्ला आहे का? आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

तुम्ही आजवर अनेक प्रकारचे ठेचे खाल्ले असेल पण हा मिरची टोमॅटो ठेचा चवीला अत्यंत स्वादिष्ट आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मिरची टोमॅटो ठेचा कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

हिरव्या मिरच्या
लसणाच्या पाकळ्या
तेल
टोमॅटो
कोथिंबीर
मीठ

कृती

मोठ्या आचेवर गरम तव्यावर १०-१२ हिरव्या मिरच्या भाजून घ्या त्यानंतर एक मिनिटे लसणाच्या ८-१० दहा पाकळ्या भाजून घ्या. त्यानंतर त्यावर तेल घाला. त्यानंतर त्यात टोमॅटो घाला आणि २ ते ३ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्या,शेवटी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. संपूर्ण मिश्रण खलबत्त्यात बारीक करून घ्या. या ठिकाणी तुम्ही मिक्सरचा वापर सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये मिश्रण खूप जास्त बारीक होते, त्यामुळे मिक्सर सहसा टाळावे. शेवटी कोथिंबीर घाला आणि झणझणीत मिर्ची टोमॅटो ठेचा तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

thawariskitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावरान झणझणीत मिरची टोमॅटो ठेचा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सोपी रेसिपी” अनेक युजर्सना ही रेसिपी खूप आवडली आहे. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर रेसिपीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही हटके रेसिप नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video how to make mirchi tomato thecha easy recipe video ndj