हिवाळ्यात मिळणाऱ्या विविध हिरव्या पालेभाज्या फक्त तुमच्या जिभेचे चोचले पुरवत नाही तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. पालेभाज्या हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं. चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाकवतची भाजी साहित्य

  • २ जुडी चाकवत
  • १/२ कप शेंगदाणे
  • १ टेबलस्पून बेसन पीठ
  • १/४ टीस्पून जीरे
  • १/८ टीस्पून हळद
  • १ चिमूट हिंग
  • तेल
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • २ तुकडे खोबरे
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ घालावे

चाकवतची भाजी कृती

स्टेप १
प्रथम आपण चाकवत निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्यावे. मग एक कढईमधे पाणी घालून त्यात चाकवताची भाजी व शेंगदाणे घालून शिजवून घ्यावे. मग हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, खोबरे, हे सर्व बारीक वाटून घ्यावे.

स्टेप २
एक कढईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे घालून फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक केलेली मिश्रण घालून परतावे. थोड्या वेळ परतून झाल्यावर चाकवत शिजवून घेतलेला त्यात बेसन पीठ घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे.

हेही वाचा >> घाटी स्टाईल मिरची मसाला; २० दिवस टिकणारी चटपटीत हिरवी मिरची फ्राय

स्टेप ३
मग चाकवत फोडणीमध्ये घालून त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.

स्टेप ४

आपली चाकवतची भाजी तयार झाली आहे. एक वाटीमध्ये काढून गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter special know how to make chakvat or bathua recipe at home chakvat bhaji recipe in marathi srk