वाचा नसलेली गीता ही भारतीय मुलगी पाकिस्तानी रेंजर्सना सीमेलगत सापडल्यानंतर त्या देशात जेथे १३ वर्षे वाढली, जेथे तिच्यासाठी तिच्या खोलीत खास देव्हारा बसविण्यात आला, ते अनाथालय अब्दुल सत्तार एढी आणि त्यांच्या पत्नी बिल्किस एढी यांच्या न्यासाचे (ट्रस्टचे) होते. अब्दुल सत्तार आणि बिल्किस या दाम्पत्याने गीताला स्वत:ची मुलगीच मानले होते. अशा अनेक पोरक्या मुला-मुलींसाठी एढी दाम्पत्य गेली ६० वर्षे काम करीत होते, त्यापैकी अब्दुल सत्तार एढी यांचे निधन गेल्या शुक्रवारी (८ जुलै) झाल्याने दक्षिण आशियाई देशांमधील एक महत्त्वाचे मानवतावादी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी शांतता पुरस्कार (२००७), सोव्हिएतकालीन रशियाचा लेनिन शांतिपुरस्कार (१९८८), मॅगसेसे पुरस्कार (१९८६), युनेस्कोचा ‘मदनजीत सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ (२००९), पाकिस्तानचा ‘निशान-ए- इम्तियाज्म’ (१९८९), आदी अनेक पुरस्कारांची मोहोर अब्दुल सत्तार एढी यांच्या कामावर होतीच. पण आर्मेनियातील भूकंपापासून ते अगदी अमेरिकेतील कॅटरिना वादळाने झालेल्या संहारापर्यंत अनेक ठिकाणी पोहोचलेले ‘एढी फाऊंडेशन’चे स्वयंसेवक, ही एढी यांच्या प्रेरणेची खरी पताका होती. एवढे काम करताच आहात तर इस्लामसारख्या ‘उदात्त मूल्यां’साठी तरी करा, ही त्या धर्मातील सनातन्यांची अपेक्षा पार मोडीत काढत बिगरमुस्लिमांसाठीही एढी काम करत राहिले. चालू स्थितीतील दोन हजार रुग्णवाहिकांचे त्यांनी उभारलेले जाळे, हा सध्या तरी एखाद्या बिगरसरकारी संस्थेने केलेला जागतिक विक्रम आहे. पाकिस्तानात कराचीसह सर्वच शहरांत अतिरेक्यांचे हल्ले वाढले, तेव्हा जखमींना मदतीचा पहिला हात अनेकदा एढी फाऊंडेशननेच दिला होता.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar edhi
First published on: 12-07-2016 at 04:29 IST