कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक द्वंद्वाची चर्चा सगळीकडे आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत फिरोझशाह कोटलाच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
ट्वेन्टी-२० प्रकारात पाकिस्ताविरुद्ध भारतीय महिलांची कामगिरी ५-१ अशी भक्कम आहे. हाच सूर कायम राखत विश्वचषकाच्या गुणतालिकेत स्थान मजबूत करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. बांगलादेशला नमवत भारत़ाने दमदार सुरुवात केली आहे. कर्णधार मिताली राज, युवा स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि वनिता यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
अनुभवी झूलन गोस्वामीकडे गोलंदाजीची धुरा आहे. अष्टपैलू अनुजा पाटील जमेची बाजू आहे. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रतिसादात पारंपरिक प्रतिस्पध्र्याना चीतपट करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.
संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), झूलन गोस्वामी, वेदा कृष्णमूर्ती, वेल्लास्वामी वनिता, अनुजा पाटील, राजेश्वरी गायकवाड, एकता बिस्त, थिरुश कामिनी, हरमनप्रीत कौर, निरंजना नागार्जुन, शिखा पांडे, पूनम यादव, दीप्ती शर्मा, सुशमा वर्मा.
पाकिस्तान : साना मीर (कर्णधार), अलिया रियाझ, अनम अमिन, असमाविआ इक्बाल, आयेशा झफर, बिसमाह मारुफ, दिआना बेग, इराम जावेद, मुनीबा अली, नाहिदा खान, नाइन अबिदी, निदा दार, सादिआ युसूफ, सिद्रा अमीन, सिद्रा नवाझ.
* स्थळ : फिरोज शहा कोटला
* वेळ : दुपारी ३.०० पासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २