विराट कोहलीविरोधात केलेल्या ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंतर एंड्रयू फ्लिंटॉफ याला कोण अमिताभ बच्चन? असा प्रश्न पडला. असो. पण फ्लिंटॉफ जरी बॉलीवूडच्या महानायकाला ओळखत नसला तरी वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल मात्र अमिताभ यांचा मोठा चाहता आहे. नुकतेच गेल याने अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. ( Full Coverage || Fixtures || Photos )
येत्या गुरूवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. त्याआधी ख्रिस गेलने अमिताभ यांची भेट घेतली. अमिताभ यांनी यावेळी ‘बिग बी’ फ्रेम आठवण भेट म्हणून गेलला दिली. या भेटीचा फोटो ख्रिस गेलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ हे क्रिकेटचे चाहते आहेत. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटपटूंप्रमाणेच अमिताभ यांचेही नाव चर्चेत आहे. नुकतेच अमिताभ यांनी विराटला टोमणा मारणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एंड्रयू फ्लिंटॉफला सडेतोड उत्तर दिले होते. फ्लिंटॉफने विराटची तुलना जो रुटशी केल्याचे अमिताभ यांना आवडले नाही. फ्लिंटॉफच्या वादग्रस्त ट्विटच्या उत्तरादाखल लिहिलेल्या टि्वटमध्ये अमिताभ यांनी, “कोण रूट, रूटला मुळापासून उखडून देऊ…!!!” असे सडेतोड उत्तर दिले. त्यावर फ्लिंटॉफने, कोण अमिताभ बच्चन? अशी प्रतिक्रिया दिली होती.

What an absolutely legend, @amitabhbachchan Thanks for the invite and hospitality at your home, thanks also for the books. The boss wants me to score a 100 and India win but I would take the win rather than the 100 😊. #Love&Respect to a great man, Mr Bachchan. The wine & food 👌🏿👍🏿👊🏿

A photo posted by KingGayle 👑 (@chrisgayle333) on

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs west indies chris gayle meets amitabh bachchan gets a special message