दिमाखदार सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात बांगलादेशवर ४९ धावांनी विजय मिळवला.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हेयलेय मॅथ्यूज आणि स्टेफनी टेलर यांनी ६७ धावांची सलामी दिली. मॅथ्यूजने ४१ धावांची खेळी केली. स्टेफनीने ४१ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ४० धावा केल्या. डिंड्रा डॉटिनने ११ चेंडूंत २४ तर स्टॅसी किंगने १५ चेंडूंत २० धावांची उपयुक्त खेळी केली. वेस्ट इंडिजने १४८ धावांची मजल
मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव ९९ धावांतच संपुष्टात आला.