ट्विटरचं नावं घेतलं की एलॉन मस्क (Elon Musk) हे नाव आपोआप समोर येतंच. ट्विटरचं डील असो किंवा त्यांची इतर ट्विट्स असोत एलॉन मस्क हे कायमच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा त्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवर ताबा घेतल्यानंतरच ट्विटर ब्लू सेवेसाठी शुल्क आकारण्यात येणार हे निश्चितच होते. ट्विटरने सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. पण आता फक्त ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेणाऱ्यांनाच ब्लू टिक मिळणार असल्याचे, मस्कने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मस्क ब्लू टिक काढून घेणार

ट्विटरवर रिया नावाच्या युजरने एलॉन मस्कला विचारले की ज्यांच्या ट्विटरवर आधीपासून ब्लू टिक आहे त्यांचे काय होईल? रियाने असेही लिहिले आहे की, आता ब्लू टिक कोणत्याही व्यक्तीला पैशांद्वारे दिली जात आहे, तर आधी फक्त लोकप्रिय लोकांना दिली जात होती. याला उत्तर देताना मस्क म्हणाले की, लवकरच मोफत मिळणाऱ्या ब्लू टिक्स लोकांकडून काढून घेण्यात येतील. म्हणजेच त्यांच्या खात्यातून ब्लू टिक काढून टाकण्यात येणार आहे, आता फक्त ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेणाऱ्यांनाच ब्लू टिक मिळणार आहे. मस्कने आपल्या ट्विटमध्ये ‘लेगसी ब्लूटिक’चा उल्लेख केला आहे.

(हे ही वाचा : WhatsApp ओपन न करता पूर्ण मेसेज वाचायचयं? ‘ही’ ट्रिक फॉलो करा, समोरच्याला मेसेज वाचलेले समजणारही नाही )

वास्तविक, लेगसी ब्लू चेक हे ट्विटरचे सर्वात जुने मॉडेल आणि पहिले सत्यापन मॉडेल होते, ज्याच्या अंतर्गत कंपनी सर्व प्रकारच्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, क्रीडा कंपन्या, सरकार इत्यादींना ब्लू टिक्स देत असे. पण आता मस्क त्यात बदल करत आहेत. आता फक्त त्या लोकांनाच ब्लू टिक मिळेल जे ट्विटर ब्लू चे सबस्क्राईब करतील.

भारतात twitter ब्लू फीच्या किंमती

ट्विटर ब्लूची सेवा नुकतीच भारतात सुरू झाली आहे. अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना ट्विटर ब्लूसाठी दरमहा ९०० रुपये मोजावे लागतील, तर वेब वापरकर्त्यांना दरमहा ६५० रुपये मोजावे लागतील. ट्विटर ब्लू मध्ये, वापरकर्त्यांना ट्विट पूर्ववत करणे, लाँग एचडी व्हिडीओ अपलोड करणे, शोधात प्राधान्य इत्यादी अनेक सुविधा मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk said legacy blue checks on twitter the blue ticks on verified handles that have not subscribed to twitter blue will be removed soon pdb