How To Recognize Fake Medicine By just Scanning QR Code know details of new project by Modi government | Loksatta

Fake Medicine: QR कोड स्कॅन करून भेसळयुक्त औषध कसे ओळखाल? केंद्र सरकारचा नवा प्रकल्प जाणून घ्या

Fake Medicines Can Be Spotted Through QR: तुमची औषधं सुरक्षित आहेत का? तुमच्या औषधांमध्ये भेसळ तर होत नाही ना? औषधांचा सतत साईड इफेक्ट् जाणवतोय का?

Fake Medicine: QR कोड स्कॅन करून भेसळयुक्त औषध कसे ओळखाल? केंद्र सरकारचा नवा प्रकल्प जाणून घ्या
How To Recognize Fake Medicine By just Scanning QR Code

Fake Medicines Can Be Spotted Through QR: तुमची औषधं सुरक्षित आहेत का? तुमच्या औषधांमध्ये भेसळ तर होत नाही ना? औषधांचा सतत साईड इफेक्ट् जाणवतोय का? या सर्व प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी लवकरच एक नवे कोरे तंत्रज्ञान लाँच केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या प्रकल्पाच्या मदतीने भेसळयुक्त औषधे आता आपण त्यांच्यावरील QR (क्युआर) कोड स्कॅन ओळखू शकता.निकृष्ट दर्जाच्या आणि बनावट उत्पादनांचा वापर रोखण्यासाठी सरकार लवकरच टॉप औषध निर्मात्यांसाठी ‘ट्रॅक अँड ट्रेस’ यंत्रणा सुरू करणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सुमारे ३०० टॉप औषध निर्मात्यांना प्राथमिक पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा (क्यूआर) कोड लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. १०० रुपयांपेक्षा अधिक दरात विकल्या जाणार्‍या औषधांवर हे क्यूआर कोड असणे आवश्यक असणार आहे.

ट्रॅक आणि ट्रेस कसे काम करणार?

ट्रॅक आणि ट्रेस ही प्रस्तावित यंत्रणा वापरून ग्राहकांना QR कोड स्कॅन करता येतील त्यानंतर आपण संबंधित औषदाची सरकारी संकेतस्थळावर जाऊन वैधता तपासून पाहू शकाल. आपल्याला औषधाचे योग्य व जेनेरिक नाव, ब्रँडचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख आणि उत्पादन परवाना क्रमांक अशी सर्व माहिती इथे दाखवली जाईल.

Sleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच

आपल्याला सरकारी पोर्टलवर युनिक आयडी कोड फीड करू शकतील आणि मोबाईल त्याचा मागोवा घेता येईल. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक विकल्या जाणार्या ३०० हुन अधिक औषधांचा या यादीत समावेश असेल या औषधांच्या पॅकेजिंगवर बारकोड छापले जाणार आहेत. या प्रणालीमुळे खर्चात ३-४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, केंद्र सरकार सध्या केंद्रीय डेटाबेस एजन्सी स्थापन करण्यावर काम करत आहे जिथे ग्राहकांना औषधांची संपूर्ण माहिती एकाच बार कोडवर मिळवता येईल.

Diabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सुमारे १० टक्के वैद्यकीय उत्पादने निकृष्ट व भेसळयुक्त आढळून आली होती. याबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी ही नवी प्रणाली फायदेशीर ठरेल असेही सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
EPF खात्याचं केवायसी ऑनलाइन अपडेट कसं करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे

संबंधित बातम्या

नेटफ्लिक्स आणखी स्वस्त होणार? कंपनीनं दिले संकेत
कंटेन्ट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! TikTok भारतात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात
Airtel चा ९१२ GB डेटाचा प्लॅन माहितेय? १ वर्षाचा रिचार्ज आणि अनलिमिटेड कॉल्स, फ्री हॉटस्टार
खुशखबर! जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने लाँच केले ३० दिवसांसाठीचे रिचार्ज प्लॅन; किंमत जाणून घ्या
Amazon Flipkart sale: सेलमध्ये सॅमसंग स्मार्टफोन्सचा दबदबा, पहिल्याच दिवशी १ हजार कोटींची विक्री, ‘हा’ फोन ठरला बेस्ट सेलर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर