Jio 5G service rollout from October 5 with trial run in these 4 cities | Loksatta

जीओचं ठरलं! दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…

जीओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता Airtel नंतर Jio ने 5G सेवेची घोषणा केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहक Jio True 5G सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

जीओचं ठरलं! दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…
चार शहरात मिळणार सेवा. (Pic Credit-financialexpress)

जीओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता Airtel नंतर Jio ने 5G सेवेची घोषणा केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहक Jio True 5G सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ५ ऑक्टोबरपासून तुम्हाला 5G सेवा वापरता येणार आहे. यानिमित्त कंपनीने वेलकम ऑफरही जारी केला आहे. वेलकम ऑफर अंतर्गत, कंपनी ग्राहकांना 5G सेवेचा अनुभव घेण्याची संधी देत ​​आहे.

सुरुवातीला, कंपनी दिल्ली, वाराणसी, मुंबई आणि कोलकाता येथे आपली सेवा सुरु करणार आहे. जीओचे म्हणणे आहे की, यूजर्स सेवा अनुभव करून त्यांचा अभिप्राय देऊ शकतात, ज्यामुळे त्यांना सेवा आणखी सुधारण्यास मदत होईल. ५ ऑक्टोबरपासून सर्व 5G हँडसेट यूजर्सना JIO 5G मिळणार नाही, सध्या कंपनीने ते इन्वाइट बेस्ड ठेवले आहे. 5G साठी आमंत्रण फक्त 5G हँडसेट यूजर्ससाठी उपलब्ध असेल, परंतु कंपनी किती यूजर्सना आमंत्रण पाठवेल हे स्पष्ट नाही. कंपनीने याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.

आणखी वाचा : 5G Launch In India: एअरटेल वापरकर्ते ‘या’ पद्धतीने घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद; जाणून घ्या टिप्स…

1Gbps स्पीड

जीओची सेवा स्टँड अलोन आर्किटेक्चरवर काम करेल. यामध्ये यूजर्सना अॅडव्हान्स 5G नेटवर्क मिळेल. तसेच, तुम्हाला जुन्या 4G नेटवर्कवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामध्ये, यूजर्सना लो-लेटन्सी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉईस, एज कंप्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग सारखी फंक्शन्स मिळतील.

कंपनी ७०० MHz, 3500 MHz आणि 26 GHz बँडवर सेवा देईल. जिओ ही एकमेव कंपनी आहे जी ७०० मेगाहर्ट्झच्या बँडवर 5G सेवा पुरवते. यामुळे तुम्हाला चांगले नेटवर्क कव्हरेज मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच कंपनी वेलकम ऑफरही देत ​​आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना १ Gbps + च्या वेगाने अमर्यादित 5G डेटा मिळेल. कंपनी लवकरच इतर बीटा ट्रायल शहरांची यादी जाहीर करू शकते.

बीटा टेस्टिंगचा फायदा

जोपर्यंत कंपनी त्या शहरातील नेटवर्क कव्हरेज पूर्ण करत नाही तोपर्यंत वापरकर्ते बीटा टेस्टिंग वापरू शकतात. त्याचबरोबर कंपनी यासाठी लोकांना आमंत्रणही पाठवेल. म्हणजेच याचा लाभ सर्वांनाच मिळणार नाही. तथापि, बहुतेक वापरकर्त्यांना याचा लाभ मिळेल, ज्यांच्याकडे 5G समर्थित 5G फोन आहे आणि ते सक्षम क्षेत्रात राहतात. यासाठी वापरकर्त्यांना नवीन सिम किंवा नवीन स्मार्टफोनची गरज भासणार नाही. अंबानी यांनी 5G सेवा परवडणारी असेल, असे लॉन्च प्रसंगी माहिती दिली होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Telegram वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी: कंपनीने कमी केल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनच्या किमती; जाणून घ्या नवी किंमत…

संबंधित बातम्या

विश्लेषण: Apple Tax वरुन टेक जगतात दोन गट; एलॉन मस्क विरुद्ध Apple वादाच्या केंद्रस्थानी असलेला हा कर आहे तरी काय?
‘PTRON’ने सादर केला जबरदस्त नेकबँड, सिंगल चार्जवर ६० तासांच्या बॅटरी लाइफचा दावा, किंमत केवळ..
FLIPKART BLACK FRIDAY SALE : संधी सोडू नका, ‘या’ SMART LED टीव्हींवर मिळतंय बेस्ट डिल, जाणून घ्या ऑफर
Vivo च्या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरीसह १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट, जाणून घ्या
विश्लेषण: Call Recording करता येणारे सर्व Apps उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या कारण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल
BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू
सातारा: राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढणार-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…
“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा