वनप्लस सीरिजबाबत मोबाईलप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता असते. नव्या सीरिजमध्ये काय फिचर्स असतील याबाबत चर्चा असते. आता OnePlus 10 मोबाईल फोन यावेळी अपेक्षेपेक्षा लवकर लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. OnePlus 10 सीरीजचा नवीन फोन यावेळी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला लॉन्च केला जाईल. दुसरीकडे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत लॉन्च झालेला OnePlus 9RT अद्याप भारतात लॉन्च झालेला नाही. एका 91 मोबाईलच्या वृत्तानुसार, OnePlus 10 सीरीज फोनची युरोप आणि चीनमध्ये चाचणी सुरू आहे. तसेच, हा फोन जानेवारी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतो. दरवर्षी OnePlus मार्च किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आपल्या सीरिजचा पहिला फोन लॉन्च करतो. यानंतर, वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत T हे नाव जोडून नवीन मालिका सादर करते. OnePlus 10 मालिकेतील टॉप व्हेरिएंट Samsung Galaxy S22 स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. यामध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील पाहायला मिळतील. मात्र, आतापर्यंत लीकमधून फारशी माहिती समोर आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

OnePlus 10 सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. OnePlus 10 आणि OnePlus 10 Pro अशी त्यांची नावे आहेत. वनप्लसचा हा पहिला फोन असेल, ज्यामध्ये युनिफाइड ऑपरेटिंग सिस्टम असेल. हे वनप्लसच्या ऑक्सिजन आणि ओप्पोच्या कलर ओएसच्या सहकार्याने तयार केले गेले आहे. हे दोघे मिळून २०२२ मध्ये ओएस आणतील.

Apple ची सेल्फ रिपेअर योजना; आता स्पेअर पार्ट्स खरेदी करून दुरूस्त करा आयफोन

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये युजर्सना नवीन डिझाईन पाहायला मिळणार आहे. यामध्ये बॅक पॅनलवर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच, या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच त्याचा रिफ्रेश रेट १२०hz आहे. यात ५०००mAh बॅटरी आहे, ज्याला १२५W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus 10 series could launch in early 2022 rmt