सॅमसंग ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी सॅमसंग नवनवीन स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च करतच असते. सॅमसंग कंपनीने आपले दोन बाजेमधील टॅबलेट भारतात लॉन्च केला आहे. सॅमसंगने Galaxy Tab A9 आणि Galaxy Tab A9 Plus भारतीय बाजारामध्ये सादर केले आहेत. मनोरंजन आणि रोजच्या वापरासाठी ज्यांना टॅबलेटची गरज भासते अशा वापरकर्त्यांसाठी दक्षिण कोरियाची कंपनी असलेल्या सॅमसंगने हे टॅबलेट लॉन्च केले आहेत. या दोन्ही टॅबलेट फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गॅलॅक्सी टॅब A9 मध्ये ८.७ इंचाचा TFT एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच गॅलॅक्सी टॅब A9 + मध्ये ९० Hz रिफ्रेश रेट असणारा ११ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही टॅबलेट अँड्रॉइड १२ वर आधारित वन युआई ५.१ वर चालतो. सॅमसंग नॉक्सद्वारे हे फोन सुरक्षित असणार आहेत. तसेच मायक्रो एसडीकार्ड स्लॉटच्या माध्यमातून १ टीबी पर्यंत स्टोरेजचा विस्तार करण्यात येतो. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Flipkart Big Dussehra Sale 2023: २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार iPhone 14; ऑफर्स एकदा बघाच

गॅलॅक्सी टॅब A9 प्लस हा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मात्र गॅलॅक्सी A9 टॅबलेटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असे एक व्हेरिएंट उपलब्ध असणार आहे. दोन्ही टॅबलेटमध्ये १५ W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. गॅलॅक्सी A9 टॅबलेटमध्ये ४ जी कनेक्टिव्हीटी तर टॅब A9 प्लसमध्ये ५ जी सपोर्ट देण्यात आला आहे.

गॅलॅक्सी टॅब A9 मध्ये मिडियाटेक Helio G99 चिपसेटचा तर गॅलॅक्सी टॅब A9 प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. लहान टॅबलेटमध्ये ५,१०० mAh क्षमतेची बॅटरी व ११ इंचाच्या मॉडेलमध्ये ७,०४० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही टॅबलेटमध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा ऑटोफोकससह मिळणार आहे. मात्र Tab A9 मध्ये २ मेगापिक्सलचा सेल्फी शूट कॅमेरा मिळणार आहे. तसेच Tab A9 Plus मध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. नवीन गॅलॅक्सी टॅब A सिरीजमधील डिव्हाइस तुम्हाला अधिकृत वेबसाइट आणि Amazon वरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. गॅलॅक्सी टॅब A9 आणि गॅलॅक्सी टॅब A9 प्लसची सुरुवातीची किंमत अनुक्रमे १२,९९९ रुपये व १८,९९९ रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy tab a9 and tab a9 plus launch india with 8 mp camera 12999 and 18999 rs tmb 01