आजच्या काळात क्वचितच असा कोणी असेल जो स्मार्टफोन वापरत नाही. आपले बहुतेक काम आपल्या स्मार्टफोनद्वारे केले जाते आणि यामुळेच आपले फोन दाबामुळे गरम होतात किंवा ‘हीट-अप’ होतात. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर घाबरू नका. आज आपण अशाच काही टिप्स आणि युक्त्या जाणून घेणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमचा फोन सहज थंड ठेवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोन अ‍ॅप्स व्यवस्थापित करा

फोन सहसा तेव्हाच गरम होतो जेव्हा त्यावर जास्त दबाव असतो. तुमच्या स्मार्टफोनवरील दबाव कमी करण्यासाठी तुमच्या फोनचे अ‍ॅप्स व्यवस्थापित करा. तुम्ही वापरत नसलेले अ‍ॅप्स बंद करा आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक नसलेले अ‍ॅप फोनवरून अनइंस्टॉल करा. अशा प्रकारे तुम्ही फोन थंड ठेवू शकता.

मेसेज सेंड झाल्यानंतरही करता येणार एडिट; जाणून घ्या WhatsApp चे नवे फीचर

फोन चार्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जेव्हा तुमचा स्मार्टफोन चार्जिंगला असतो तेव्हा त्या काळात फोन न वापरण्याचा प्रयत्न करा. फोन चार्ज होत असताना वापरल्याने स्मार्टफोनच्या प्रोसेसरवर खूप दबाव येतो आणि त्यामुळे फोन गरम होतो. तसेच, नेहमी उच्च-गुणवत्तेचा चार्जर वापरा, तुमच्या स्मार्टफोनसाठी लोकल चार्जर वापरू नका.

फोनचा ब्राइटनेस कमी ठेवा

तुमच्या स्मार्टफोनला जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची ब्राइटनेस सेटिंग्ज बदलावी लागतील. तुमच्या फोन स्क्रीनची ब्राइटनेस ऑप्टिमाइझ करा. गरज नसेल तेव्हा ब्राइटनेस कमी ठेवा. यामुळे, फोन गरम होणार नाही आणि त्याच वेळी, बॅटरी लवकर कमी होणार नाही.

या सोप्या टिप्स आणि युक्त्या फॉलो करून, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे आयुष्य वाढवू शकाल आणि फोनला गरम होण्यापासून रोखू शकाल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone tips your phone will no longer overheat just use these simple tricks pvp