व्हॉट्सअ‍ॅप हे असे एक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे जे जगभरातील बहुतेक लोक वापरतात. फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अ‍ॅपमध्ये सतत नवनवीन फीचर जोडत आहे. आता अशी माहिती मिळाली आहे की, मेसेज एडिट करण्याचा पर्याय लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होऊ शकतो. एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते लवकरच पाठवलेले संदेश एडिट करू शकतील. चॅट अ‍ॅपमध्ये मेसेज रिअ‍ॅक्शनसाठी स्किन टोन सपोर्ट लवकरच दिला जाऊ शकतो, अशीही माहिती रिपोर्टमधून देण्यात आली आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच युजर्ससाठी एक नवीन ‘एडिट’ पर्याय ऑफर करणार आहे, ज्यामुळे युजर्स आधीच पाठवलेले संदेश एडिट करू शकतील. अ‍ॅपमध्ये आधीपासून असलेल्या इन्फो आणि कॉपी बटणांसह हा नवीन पर्याय उपलब्ध असेल. हे दोन्ही पर्याय अ‍ॅपमधील टेक्स्ट मेसेजवर जास्त वेळ दाबून उघडणाऱ्या मेनूमध्ये युजर्सना दिसतील.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मागे CE लिहण्याचं कारण काय? जाणून घ्या

WABetaInfo ने एडिट पर्यायाशी संबंधित काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. टेक्स्ट मेसेज जास्त वेळ दाबल्यानंतर उघडणाऱ्या पॉप-अप मेनूमधील एडिट बटण निवडल्यानंतर युजर्स टेक्स्ट एडिट करण्यास सक्षम असतील. मेसेज रिसीव्ह करणाऱ्याला या टेक्स्ट एडिटबद्दल माहिती मिळेल की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स मेसेज एडिट केल्यानंतर जुने मेसेज चेक करू शकणार नाहीत. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि डेस्कटॉप व्हर्जनवर उपलब्ध करून दिले जाईल. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये अशाच प्रकारच्या पर्यायांची अनेक वेळा चाचणी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर कंपनीने ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचर जारी केले.

कॉल करण्यासाठी आता मोबाईल नेटवर्कची गरज नाही; ‘या’ फीचरमुळे कॉलिंग होणार सोपे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसर्‍या रिपोर्टनुसार, मेसेज रिअ‍ॅक्शनसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेगवेगळ्या स्किन टोन सपोर्टवर काम करत आहे. नुकतेच सर्व सामान्य वापरकर्त्यांसाठी मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर लाँच करण्यात आले आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन स्किन टोन फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन २.२२.१३.४ वापरणाऱ्या युजर्ससाठी आधीच रोल आउट करण्यात आले आहे.