Infinix Zero 5G Today First Sale: स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने १४ फेब्रुवारी रोजी Infinix Zero 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. आता कंपनीचा हा स्मार्टफोन आज म्हणजेच १८ फेब्रुवारीला पहिल्या सेलसाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डेन्सिटी ९०० प्रोसेसर, ४८ मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसह अनेक शक्तिशाली फीचर्ससह येतो. पहिल्या सेलदरम्यान ग्राहकांना अनेक ऑफर्सही मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Infinix Zero 5G ची भारतातील किंमत

स्मार्टफोनच्या ८GB रॅम आणि १२८GB अंतर्गत स्टोरेजची किंमत १९,९९९ रुपये आहे. उपलब्ध ऑफरबद्दल बोलायचं झाल्यास, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५% अमर्यादित कॅशबॅक आहे. याशिवाय ग्राहक हा स्मार्टफोन प्रत्येक महिन्याला रु. १,६६७ च्या नो कॉस्ट ईएमआय ऑफर अंतर्गत देखील खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन कॉस्मिक ब्लॅक आणि स्कायलाइट ऑरेंज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

(हे ही वाचा: Jio Recharge Plan: ‘हा’ प्लॅन झाला १०० रुपयांनी स्वस्त! सोबत मिळणार अनेक फायदे)

Infinix Zero 5G तपशील

हा स्मार्टफोन Android 11 आधारित XOS 10 वर काम करतो. स्मार्टफोन १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा फुल-एचडी+ IPS LTPS (1,080×2,460 पिक्सेल) डिस्प्ले दाखवतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity ९०० SoC चिप वापरण्यात आली आहे. स्मार्टफोन ८GB LPDDR5 रॅम आणि १२८GB UFS ३.१ स्टोरेजसह येतो. तथापि, स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

(हे ही वाचा: तुमचे WiFi कनेक्शन स्लो होत आहे का? जाणून घ्या कारण आणि महत्त्वाच्या गोष्टी)

कसा आहे कॅमेरा?

Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, १३ मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट फ्लॅशसह १६ मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा समाविष्ट आहे.

(हे ही वाचा: Airtel चा ‘हा’ आहे सर्वात स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या फायदे)

फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ५जी, एफ एम रेडिओ, वाई-फाई ६, ब्लूटूथ, जीपीएस, ओटीजी, ३.५ एम एम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. बोर्डवरील सेन्सरमध्ये लाईट सेन्सर, बॅरोमीटर, जायरोस्कोप, जी-सेन्सर, ई-कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५,०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात ३३W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first sale of infinix zero 5g smartphone today available with huge discounts ttg