Twitter यूजर्ससाठी मोठा धक्का! आजपासून बंद होणार ‘हे’ जबरदस्त सिक्युरिटी फिचर

एलॉन मस्क हे ट्विटरचे सीईओ आहेत. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून यामध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत.

twitter close 2FA security feature for users
ट्विटरचे २FA सिक्युरिटी फिचर (image credit- Twitter)

Twiiter हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. एलॉन मस्क हे ट्विटरचे सीईओ आहेत. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून यामध्ये अनेक बदल करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची कपात, नवीन सीईओची घोषणा करणे, ब्ल्यू टिकसाठी पेड सब्स्क्रिप्शन सुरु करणे असे अनेक निर्णय मस्क यांनी घेतले आहेत. यामध्ये अजून एका निर्णयाची भर पडली आहे. आज (२०मार्च ) पासून ट्विटरने एक वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले एक सिक्युरिटी फीचर बंद करणार आहे. हे कोणते फिचर आहे आणि हे कोणासाठी बंद होणार आहे हे जाणून घेऊयात.

ट्विटरने टू-फॅक्टर प्रमाणीकरण म्हणजेच (२FA) हे महत्वाचे सिक्युरिटी फिचर आजपासून बंद होणार आहे. हे फिचर आता Twitter च्या ब्ल्यू टिक असणाऱ्या वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. ज्यांच्याकडे हे ब्ल्यू टीकेचे सब्स्क्रिप्शन नसेल त्यांना हे फिचर वापरता येणार नाही. २FA हे सिक्युरिटी फिचर महत्वाचे आहे कारण हे तुमच्या ट्विटर अकाउंटला हॅकर्सपासून वाचवते. कोणीही अनधिकृतरित्या तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करू शकत नाही.

हेही वाचा : Airtel च्या ग्राहकांना मिळतोय ५जी अनलिमिटेड डेटा; Android आणि iPhone वापरकर्त्यांना ‘या’ प्रकारे घेता येणार सुविधांचा लाभ

जर का तुम्ही अजून तुमच्या ट्विटर अकाउंटमधील सिक्युरिटी सेटिंग अपडेट केले नसेल तर आता ते लवकरात लवकर अपडेट करणे आवश्यक आहे. मागच्या महिन्यात एलॉन मस्क यांच्या twitter ने घोषणा केली आहे की, 2FA हे सिक्युरिटी फिचर वापरणाऱ्यांसाठी वापरकर्त्यांना ट्विटरची ब्ल्यू टिकचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. ज्यासाठी $८ म्हणजेच ६५० रुपये महिना मोजावे लागणार आहेत. ज्यांच्याकडे आधीपासूनच 2FA आहे त्यांना एसएमएसवर आधारित असणाऱ्या 2FA सुरु ठेवण्यासाठी Twitter Blue चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल किंवा हे फिचर बंद करावे लागेल. इतर फीचर्समध्ये Twitter Blue वापरकर्त्यांना ट्विट एडिट करणे, १०८०p व्हिडीओ अपलोड करण्यास आणि मोठे व्हिडीओ पोस्ट करता येतात.

सेटिंगमध्ये बदल कसे करावेत

१. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Twitter App वरील सेटिंगमध्ये जावे लागेल.

२. त्यानंतर तुम्हाला security and account access वर क्लिक करावे.

३. त्यानंतर सिक्युरिटी या पर्यायावर क्लिक करावे.

४. Two-Factor Authentication वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे अकाऊंट सुरक्षित करण्यासाठीचे पर्याय दिसतील.

हेही वाचा : तुमचा एसी किती ‘टन’चा आहे? एअर कंडिशनर खरेदी करताना ही माहिती असणे फायदेशीर ठरते का?

जर का २० मार्चपर्यंत तुम्ही तुमची सेटिंग अपडेट केली नाही तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही अजूनही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करू शकता. मात्र जर ट्विटरने तुमचे 2FA बंद केले तर तुमचे अकाउंट यापुढे सुरक्षित राहणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 11:01 IST
Next Story
Airtel च्या ग्राहकांना मिळतोय ५जी अनलिमिटेड डेटा; Android आणि iPhone वापरकर्त्यांना ‘या’ प्रकारे घेता येणार सुविधांचा लाभ
Exit mobile version